सोयगाव दि.२०(ज्ञानेश्वर धोंडू पाटील): लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने बुधवारी सोयगाव केंद्राअंतर्गत असलेल्या 55 मतदान केंद्रअध्यक्ष आणि मतदान केंद्र अधिकारी यांना ईव्हीएम मशीन आणि व्हीव्ही पॅट हाताळणी प्रशिक्षण देण्यात आले.सहायक निवडणूक निर्णय अधिकारी प्रवीण पांडे यांच्या अध्यक्षतेखाली बचत भुवन सभागृहात प्रशिक्षण संपन्न झाले. लोकसभा निवडणुकांमध्ये मतदान प्रकियेत पारदर्शीपणा राखण्यासाठी नव्यानेच ईव्हीएम मशीन सोबतच व्हीव्ही पॅट मशीनचा वापर करण्यात येत असल्याने याचे सखोल ज्ञान आणि हाताळणी करतांना कर्मचाऱ्यांना अडचणी निर्माण होवू नये यासाठी बुधवारी सोयगाव केंद्रातील मतदान केंद्राध्यक्ष आणि मतदान अधिकारी यांचे पहिल्या टप्प्यातील प्रशिक्षण संपन्न करण्यात आले,दरम्यान केंद्रनिहाय आठवडाभर हे प्रशिक्षण कर्मचाऱ्यांना टप्प्याटप्प्याने देण्यात येणार असल्याने ता.20 मार्च ते ता.1 एप्रिल पर्यंत हे प्रशिक्षण देण्यात येणार आहे,यावेळी सहायक निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार प्रवीण पांडे यांनी निवडणूक कर्मचाऱ्यांना व्हीव्ही पॅट हाताळणी बाबत प्रशिक्षण दिले,यावेळी निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार विठ्ठल जाधव नायब तहसीलदार सतीश देशमुख, सुधीर जहागीरदार,प्रशिक्षण नियोजन प्रमुख भालचंद्र चौधरी,सचिन ओहोळ आदींनी प्रशिक्षण दिले.