राजकारण

साखर आयुक्त कार्यालयावर 25 जानेवारी पासून शेतकरी संघटनेचे बेमुदत धरणे

अंबाजोगाई जि.बीड (प्रतिनिधी):-दुधसंघांनी दुधाला 27/- रुपये प्रतिलिटर भाव द्यावा असा देवेंद्र सरकारने 19 जून 2017 रोजी शासन आदेश काढला. सन 1963 साली शेतीमालाची आधारभूत किंमतीपेक्षा कमी दराने बाजार समितीत खरेदी विक्री करु नये यासाठी कायदा केला.साखर कारखानदारांनी ऊसाच्या FRP ची रक्कम 14 दिवसात विनाकपात एक-रकमी द्यावी.अशी ऊस नियंत्रण आदेश 1966 मध्ये कायदेशिर तरतूद असतानाही दुध, शेतीमाल आणि ऊसाला FRP मिळत नाही.तसेच बेकायदेशिर वागणा-या आमदार, खासदारांच्या दुधसंघ,बाजार समित्या आणि साखर कारखान्यांवर IAS,IPS दर्जाचे प्रशासकीय अधिकारी कसलीही कारवाई करीत नाहीत.भ्रष्ट आणि बेकायदेशिर वागणा-यांना प्रजासत्ताक दिनाचा झेंडा फडकाविण्याचा अधिकार काय?याचा जाब विचारण्यासाठी शेतकरी संघटनेच्या वतीने 25 जानेवारी 2019 पासून आयुक्त साखर, साखर संकुल, शिवाजीनगर पुणे येथे सकाळी 11.वा.रघुनाथदादा पाटील यांच्या नेतृत्वात बेमुदत धरणे आंदोलनाला सुरुवात होईल अशी माहिती शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष कालिदास आपेट यांनी दिली.
देवेंद्र सरकारला कॉग्रेस आणि राष्ट्रवादी कॉग्रेसने सन 2014 साली विश्वासमतावेळी मतदान केले. तेंव्हापासून बेकायदेशिर वागणा-या दुधसंघ,बाजार समित्या, साखर कारखाने, बॅका, पतपेढ्या, शिक्षणसंस्था यांच्यावर देवेंद्र सरकारने कसलीही कारवाई केलेली नाही. रिजर्व बॅकेचे माजी गव्हर्नर डॉ.सी.रंगराजन समितीने दोन साखर कारखान्यातील अंतराची अट काढून टाकण्याच्या शिफारसीची अंमलबजावणी केली नाही.याउलट परदेशातून महागड्या दराने दाळी,साखर,कांदा, कापूस, खाद्यतेलाची आयात करुन शेतीमालाचे भाव पाडले.भ्रष्ट कारखानदार आणि संस्थाचालकांना सरकारी वरदहस्त लाभल्याने शेतक-यांची बेमालुमपणे लूट सुरुच आहे.छ.शिवाजी महाराज, ज्योतीबा फुले,डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या महाराष्ट्रावर लागलेला शेतकरी आत्महत्त्यांचा कलंक पुसण्यासाठी शेतकरी भावा-बहीणींनी पुरेशा अंथरुण पांघरुणासह 25 जानेवारी 2019 रोजी बेमुदत धरणे कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.असे आवाहन शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष कालिदास आपेट यांनी केले आहे.

कालिदास आपेट
09822061795

बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.