भाजपाची पहिली यादी जाहीर ; बीड मधून डॉ प्रीतमताई मुंडे तर नगर मधून डॉ सुजय विखे पाटील यांना उमेदवारी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): काही दिवसांवर आलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीने उमेदवारांची यादी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केली आहे त्यात बीड मधून स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबांची कन्या डॉ प्रितम मुंडे-खाडे तर अहमदनगर(दक्षिण) मधून डॉ सुजय विखे पाटील यांच्या नावाची घोषणा पत्रकार परिषदेत केली आहे.

सत्‍ताधारी भारतीय जनता पार्टीकडून अद्याप उमेदवारांची यादी जाहिर झालेली नव्हती.आज दि.२१ रोजी भाजपकडून पहिली यादी जाहिर करण्यात आली असून त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शहा हे गांधीनगर, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, नितीन गडकरी यांच्यासह १८२ उमेदवारांचा समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वाराणसी आणि राजनाथ सिंह हे लखनौ लोकसभा मतदार संघातुन तर नितीन गडकरी हे नागपूर लोकसभा मतदार संघातून निवडणुक लढणार आहेत.

दरम्यान,लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेससह इतर काही राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांनी आपल्या उमेदवारांच्या याद्या जाहिर केलेल्या आहेत.

विशेष म्हणजे,काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँंग्रेसने त्यांच्या उमेदवारांची घोषणा केल्यानंतर सेना-भाजपकडून त्यांच्या उमेदवारांची घोषणा कधी होणार याकडे सगळयांचे लक्ष लागले असतानाच भाजपने आज (गुरूवार) पहिली यादी जाहिर केली. त्यामध्ये महाराष्ट्रातील १६ मतदार संघाचा समावेश आहे.

भाजपच्या उमेदवारांची नावे व लोकसभा मतदारसंघ पुढील प्रमाणे आहेत.

  • नंदुरबार : डॉ. हिना गावित,
  • धुळे : सुभाष भामरे,
  • रावेर : रक्षा खडसे,
  • अकोला : संजय धोत्रे,
  • वर्धा : रामदास चंद्रभान तडस,
  • गडचिरोली-चिमुर : अशोक नेते,
  • चंद्रपूर : हंसराज अहिर,
  • नागपूर: नितीन गडकरी,
  • जालना: रावसाहेब दानवे,
  • भिवंडी: कपिल पाटील,
  • मुंबई नॉर्थ: गोपाळ शेट्टी,
  • मुंबई नॉर्थ सेंट्रल: पूनम महाजन,
  • अहमदनगर: डॉ सुजय विखे,
  • बीड: डॉ. प्रीतम मुंडे,
  • लातूर: सुधाकरराव श्रृंगारे,
  • सांगली: संजयकाका पाटील

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.