सोयगाव (ज्ञानेश्वर धोंडू पाटील) दि.२१: सोयगाव जवळील आमखेडा भागात सोयगाव पोलिसांनी रंगपंचमीच्या दिवशी सापळा रचून देशी दारुवर छापा घालून एका कडून देशीदारूच्या ६९ बाटल्या हस्तगत करून सोयगाव आगारा जवळील झाडीत लपवून ठेवलेल्या देशी दारूचे दोन बॉक्स जप्त केल्याने तब्बल आठ हजारावर मुद्देमाल हस्तगत केला आहे पोलीस निरीक्षक शेख शकील, उपनिरीक्षक शरद रोडगे यांनी हि कारवाई केली.