नवी दिल्ली : परदेशात एमबीबीएस चे शिक्षण घेण्यासाठी इच्छुक विध्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी हाती लागली आहे. एमसीआय(भारतीय आयुर्विज्ञान परिषद) बोर्ड ऑफ गव्हर्नर्स एक राजपत्रित अधिसूचना काढली आहे.ज्यामध्ये परदेशात एमबीबीएस (परदेशातील बीएस-एमडी) चे शिक्षण घेऊ इच्छित असलेल्या विद्यार्थ्यांसाठी नीट चे मार्क्स निकाल जाहीर झाल्यापासून तीन वर्षे वैध राहतील.
नीट (NEET-UG : National Eligibility cum Entrance Test- Under Graduate) ही परीक्षा वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सी कडुन वर्षातून एक वेळेस घेतली जाते.
दरम्यान,भारतीय आयुर्विज्ञान परिषदेने(एमसीआय) गेल्या वर्षी एक नोटिफिकेशन मार्फत परदेशात एमबीबीएस चे शिक्षण घ्यायचे असल्यास नीट सक्तीची केली होती.