परभणी दि.२२: आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यासोबत परभणी लोकसभा संदर्भात गंगाखेड भाजपा विधानसभा अध्यक्ष तथा मा.नगराध्यक्ष गंगाखेड मा.रामप्रभु मुंडे यांनी सविस्तर चर्चा केली.परभणी लोकसभा संदर्भात शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्यासोबत चर्चा करून लवकरच निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
यावेळी उपस्थित मा.ना.अर्जुनराव खोतकर , मा.आ.रामप्रसाद बोर्डीकर, खा.संजय जाधव, आमदार तानाजी मुटकुळे, सौ.मेघना बोर्डीकर साकोरे, विठ्ठलराव रबदडे ,ॲड.व्यंकटराव तांदळे , बाबुराव पवार ,सुरेश भुमरे, सौ.विद्याताई चौधरी ,रंगनाथ सोळंके, कृष्णकांत देशमुख, महादेव गायके,अभिजीत काळे उपस्थित होते.