बजरंगबप्पा सोनवणेंच्या प्रचारार्थ शहरात जनसंपर्क अभियान
परळी दि.२२: केंद्रात, राज्यात स्वतःच्या पक्षाची सत्ता,महत्वाची मंत्री पदे असतानाही भाजपच्या खासदारांना जिल्ह्यात तर जावु द्या, ज्या गावात आपला जन्म झाला, बालपण गेले त्या परळी शहरासाठी ही काही करता येवु नये, यासारखे दुसरे दुर्दैव नाही. अपघाताने राजकीय जन्म होऊन खासदारकी मिळालेले पुन्हा मत मागण्यासाठी आल्यानंतर त्यांनी परळी शहरासाठी काय केले ? असा सवाल परळी शहरातील सुज्ञ नागरिकांनी विचारला पाहीजे, असे प्रतिपादन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केले आहे.
बीड लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस व मित्र पक्षाच्या आघाडीचे उमेदवार बजरंगबप्पा सोनवणे यांच्या प्रचारार्थ श्री.धनंजय मुंडे यंानी आज परळी शहरात जनसंपर्क अभियानांतर्गत विविध क्षेत्रातील मान्यवर, नागरिकांच्या घरी जाऊन त्यांच्या भेटी घेतल्या, त्यांच्याशी संवाद साधला.
संपुर्ण सत्ता हाती असताना एखाद्याला संपुर्ण जिल्ह्याचे सोने करता आले असते, मात्र भाजपाच्या खासदारांना जिल्हा तर दुरच परळी शहरासाठी ही काही करता आले नाही. हजारो नागरिकांना रोजगार देणारे औष्णिक विद्युत केंद्र बंद पडले, परळीच्या जीव्हाळ्याची परळी-मुंबई रेल्वे सुरू करता आली नाही, परळी-अंबाजोगाई, परळी-बीड या महामार्गांची दुरूस्ती करता आली नाही, परळीचे नाव बारा ज्योतिर्लिंगाच्या यादीतून वगळले जाते तरीही खासदार काहीच करत नाहीत याचे आपल्याला आश्चर्य वाटते. किमान परळी शहरात नविन उद्योग तर दुर आहे ते थर्मल सारखे उद्योगही सुरू ठेवता आले नाहीत. स्वतः मोठे झाले शहराला मात्र मोठे करता आले नाही, याची त्यंाना साधी खंत ही वाटु नये, हे परळीकरांचेच दुर्देव म्हटले पाहीजे, अशा शब्दात त्यांनी भाजपच्या खासदाराचा अपयशाचा पाढा वाचला.
परळीचे औष्णिक विद्युत केंद्र मी कदापिही बंद पडु देणार नाही, परळीच्या प्रत्येक जिव्हाळ्याच्या प्रश्नासाठी शेवटच्या श्वासापर्यंत मी प्रयत्न करेल असा शब्द धनंजय मुंडे यांनी देतानाच मत मागायला येणार्या भाजपच्या खासदारांना आता सवाल विचारू नका तर मतपेटीतून त्यांच्या निष्क्रियतेला उत्तर देऊन राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या उमेदवाराला मी स्वतः उमेदवार आहे असे समजुन विजयी करा, असे आवाहन त्यांनी केले.
अपघाताने राजकीय जन्म झालेल्या खासदारांनी परळी शहरासाठी काय दिले? असा सवाल या संवाद अभियानादरम्यान बोलताना शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी यांनी उपस्थित केला. यावेळी माजी शहराध्यक्ष चंदुलाल बियाणी, जि.प.सदस्य मधुकर आघाव, कृ.उ.बा.समिती सभापती ऍड.गोविंद फड, सुर्यभान मुंडे, भास्करमामा चाटे, उपनगराध्यक्ष अय्युबभाई पठाण, माजी नगराध्यक्ष दिपक नाना देशमुख, गटनेते वाल्मिकअण्णा कराड, सभापती भाऊसाहेब कराड, संजय फड, जयराज देशमुख, विजयकुमार गंडले, प्रा.विनोद जगतकर, जयप्रकाश लड्डा, शरदभाऊ मुंडे, सुरेश अण्णा टाक, संजय आघाव, प्रा.पी.एल. कराड, रवि मुळे, दिलीप कराड, शंकर कापसे, सय्यद सिराज, अनंत इंगळे, प्रणव परळीकर, सचिन मराठे, सचिन जोशी, अजय जोशी, ज्ञानेश्वर होळंबे, भैय्या जाधवर, जयदत नरवटे, योगेश स्वामी, शरद चव्हाण, श्रीकांत माने, चव्हाण सर, मुन्ना काळे, बाळु वाघ, दत्ताभाऊ सावंत, ऍड.मनजित सुगरे, बाळु फड, संजय आघाव, अमित केंद्रे, बळीराम नागरगोजे, सचिन कराड, संग्राम गित्ते, अमित भांगे, बालाजी दहिफळे, रणजित सुगरे, धम्मा अवचारे, सुनिल तरटे आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.