अंबाजोगाई (प्रतिनिधी): येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीन भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 128 व्या जयंतीनिमित्त सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने यावर्षीही प्रबोधनपर व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे.अशी माहिती उत्सव समितीच्या वतीने देण्यात आली आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीची बैठक समितीचे अध्यक्ष डॉ.श्रीहरी नागरगोजे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच संपन्न झाली.या बैठकीत प्रारंभी समितीचे सचिव भगवानराव ढगे यांनी मागील वर्षाचा जमा खर्चाचा आढावा सादर केला. बैठकीत त्यावर
सविस्तर चर्चा होवून सर्वानुमते त्यास मान्यता देण्यात आली.यावर्षी 14 एप्रिल 2019 रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 128 व्या जयंतीनिमित्त समितीच्या वतीने विविध उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.याच उपक्रमाचा एक भाग म्हणुन जयंतीनिमित्त महाराष्ट्रातील नामांकीत व्याख्यात्यांना निमंत्रीत करून प्रबोधनपर व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे.या विषयावर ही सदर बैठकीत चर्चा झाली व निर्णय घेण्यात आले.या बैठकीला समितीचे डॉ.श्रीहरी नागरगोजे (अध्यक्ष),
ज्येष्ठ मार्गदर्शक प्रा. एस.के.जोगदंड,लंकेश वेडे(कार्याध्यक्ष), भगवानराव ढगे (सचिव),प्रा.गौतम गायकवाड (सहसचिव),संभाजीराव सातपुते, सुखदेव भुंबे,एकनाथ टोनपे,शिवाजी खोगरे, प्रा.धोंडीराम झरीकर, रामेश्वर खाडे,धनराज चौधरी व कार्यकारीणी सदस्य यांची उपस्थिती होती.बैठकीचे सुत्रसंचालन समितीचे कार्याध्यक्ष लंकेश वेडे यांनी केले तर उपस्थितांचे आभार समितीचे सचिव भगवानराव ढगे यांनी मानले.