सोयगाव च्या पारेषण वीज केंद्रात शॉर्ट सर्किट ; साहित्य जळून खाक

सोयगाव(ज्ञानेश्वर धोंडू पाटील): शहरातील वीज वितरणच्या पारेषण विभागाच्या कार्यालयातील 132 वीज केंद्रात अचानक उच्च दाबाच्या वाहिनीमध्ये वीज तारांच्या घर्षणात शॉर्ट सर्किट झाल्याने लागलेल्या आगीत वीज साहित्य जळून खाक झाले आहे शुक्रवारी दुपारी अचानक लागलेल्या आगीत वीज केंद्राच्या तब्बल अर्धा एकर क्षेत्रात आग डोंब उसळल्यान शहरात खळबळ उडाली होती दरम्यान आगीची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत आग नियंत्रणात आणण्यासाठी मोठे प्रयत्न केले आगीच्या नियंत्रणासाठी टकर मागविण्यात आले परंतु पाण्याचा साठाच कमी प्रयत्न अपयशी ठरले होते या आगीत सुमारे वीज वितरणच्या पारेषण विभागाचे पन्नास हजाराचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे दरम्यान अग्निशमन यंत्रणा सोयगावला कार्यान्वित नसल्याने मोठा गोंधळ उडाला होता पारेषण विभागाचे उपकार्यकरी अभियंता गणेश पवार घटनास्थळी नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला दरम्यान आग लागताच पारेषण विभागातून तालुकभर वीज उपकेंदराचा वीज पुरवठा बंद करण्यात आला होता अजिंठा सोयगाव जरंडी आदी वीज उपकेंद्रांचा वीज पुरवठा सायंकाळ पर्यंत ठप्प करण्यात आला होता भर उन्हात लागलेल्या आगीचे लोळ उंचच्या उंच दिसत होते आजीनाथ भोजने भूषण चौधरी प्रताप अग्रवाल विकास शिंदे विजय निकम राजू ढगे विष्णू लाड पप्पू पाटील योगेश देवकर आदी कर्मचारी व नागरिकांनी आग दोन तासाच्या अथक प्रयत्नानंतर आटोक्यात आणली परंतु शेवट पर्यंत कोणतेही वरिष्ठ अधिकारी घटना स्थळी उपस्थित नव्हते असे सुत्रांकडून कळते.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.