पाटोदा (शेख महेशर): सोमवार दि. २५ मार्च रोजी भाजपा-शिवसेना – रिपाइं – रासप महायुतीच्या उमेदवार खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांचा उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी कार्यालय बीड येथे दु.२ वाजता दाखल करण्यात येणार आहे.
या वेळी मा.ना.पंकजाताई मुंडे यांच्या सह भाजपचे सर्व आमदार, माजी आमदार, जिल्हा महायुतीचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. तरी शिरूर(कासार)तालुक्यातील सर्व भाजपा लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, शक्तिकेंद्र प्रमुख, बुथप्रमुख,भाजपा कार्यकर्ते, महायुतीचे कार्यकर्ते यांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे.
असे आवाहन भाजपा विद्यार्थी आघाडीचे बीड जिल्हाउपाध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य वंजारी महासंघाचे बीड जिल्हा सरचिटणीस गोकुळ सानप यांनी केले आहे.
अर्ज सादर केल्या नंतर भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून रॅली निघेल. व छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून माने कॉम्प्लेक्स येथे रॅलीचा समारोप होऊन तिथे महायुतीची विराट सभा होईल. सभेला महायुतीचे प्रमुख नेते मार्गदर्शन करणार आहेत. तरी भाजपा – शिवसेना – रिपाइं – रासप महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जास्तीत – जास्त संख्येने उपस्थित राहून विरोधकांना भाजपा शिवसेना महायुतीच्या सरकारच्या कार्याची ताकत दाखवून द्यावी असे नम्र आवाहन भाजपा विद्यार्थी आघाडीचे बीड जिल्हाउपाध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य वंजारी महासंघाचे बीड जिल्हा सरचिटणीस गोकुळ सानप यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.