औरंगाबाद जिल्हासोयगाव तालुका

देशाचे नाव उज्वल करणाऱ्या तालुक्यातील मान्यवरांचा पत्रकारदिनी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटनेकडून गौरव

सोयगाव दि.७:ज्ञानेश्वर युवरे(पाटील)― 'दर्पण'कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटनेचे जिल्हा कोषाध्यक्ष पत्रकार राजू दुतोंडे यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करीत अभिवादन करण्यात आले. तत्पूर्वी देशासाठी बलिदान देणारे शहीद जवान, दिवंगत जेष्ठ पत्रकार, कोरोना संसर्गामुळे जीव गमावलेले पत्रकार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
शहरासह तालुका,राज्य व देशाचे नाव उज्वल करणाऱ्या तालुक्यातील व्यक्तींचे या पत्रकारदिनी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटना सोयगाव तालुक्याच्या वतीने सीमा सुरक्षा (बल) दलात एकवीस वर्षे सेवा बजावणारे व नुकतेच एकतीस डिसेंम्बर रोजी सेवानिवृत्त झालेले किशोर बुधा शिंदे रा. गोंदेगाव यांचा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.केतन काळे यांच्याहस्ते पुष्पहार, शाल,श्रीफळ व श्रीगणेशा ची प्रतिमा भेट देऊन गौरविण्यात आले.हळद व अद्रक लागवड यंत्र तयार करून सोयगावचे नाव देशपातळीवर उज्वल करणारे राष्ट्रपती कडून सत्कारीत इंद्रजितसिंह बलबीरसिंह खस यांचा जिल्हा कोषाध्यक्ष राजू दुतोंडे यांच्या हस्ते तर कोरोना काळात ग्रामीण भागातील गोरगरीब विध्यार्थ्यांना शिक्षण घेता यावे यासाठी स्टार्टअप सुरू करून देश व परदेशातील विद्यार्थीना स्टार्टअप च्या माध्यमातून जोडून शिक्षण मिळावे यासाठी प्रयत्न करून तालुक्याचे नाव उज्वल करणारे हर्षल रामदास फुसे यांचा जिल्हा संघटक यादवकुमार शिंदे यांच्या हस्ते पुष्पहार,शाल,श्रीफळ व श्रीगणेशाची प्रतिमा भेट देऊन गौरविण्यात आले. ग्रामीण रुग्णालयाच्या आरोग्य मदतनीस ज्या महिला रुग्णालयात प्रसूतीनंतर त्यांना आई प्रमाणे वागणूक देत त्यांना रात्री बेरात्री स्वतः घरून आहार देत सहकार्य करतात त्या सौ. सुशिलाबाई रमेश रोकडे यांना पण गौरविण्यात आले.अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटनेकडून सन २०२१ या वर्षांपासून पत्रकारदिनी सुरू करण्यात आलेला प्रथम गौरव पुरस्कार वरील मान्यवरांना देण्यात आला.गौरविण्यात आलेल्या मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले तर जेष्ठ पत्रकार आबासाहेब बावस्कर यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी
अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष दिलीप शिंदे, सचिव संदीप इंगळे, शहराध्यक्ष सुनील काळे,वैद्यकीय अधिकारी डॉ.केतन काळे,यादवकुमार शिंदे,ज्ञानेश्वर वाघ,शेख गुलाब,आबासाहेब बावस्कर,ज्ञानेश्वर युवरे, योगेश बोखारे, शेख सुलेमान,ईश्वर इंगळे,यासीन बेग आदी पत्रकारांसह किसान सेनेचे तालुका संघटक चंद्रास रोकडे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार राजू दुतोंडे यांनी मानले.

    WhatsApp वर बातम्या हव्यात ?


    बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

    This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.