पाटोदा तालुका

तुपेवाडी व कारेगाव येथे चारा छावण्या सुरू ; पत्रकार दयानंद सोनवणे यांच्या हस्ते झाले उद्घाटन

पाटोदा(शेख महेशर): डोंगरकिन्ही परिसरातुन गेल्या अनेक दिवसांपासून चारा छावण्यांची मागणी होत होती. शेवटी कारेगाव येथे तर डोंगरकिन्ही पासुन जवळच असलेल्या तुपेवाडी येथे चारा छावण्या सुरू करण्यात आल्या. डोंगरकिन्ही येथील छावणीचे उद्घाटन दैनिक कार्यारंभचे पाटोदा तालुका प्रतिनिधी पत्रकार दयानंद सोनवणे व जि.प.सदस्य अॅड. प्रकाश कवठेकर यांच्या हस्ते करण्यात आले. डोंगरकिन्ही परिसरात गेल्या काही महिन्यांपासून चारा टंचाई निर्माण झाली आहे. पिण्याच्या व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची ही टंचाई आहे. साखर कारखान्याकडुन येणाऱ्या ऊसाच्या वाढ्यावर इतके दिवस शेतकर्‍यांनी जनावरे जगविली. ज्यांची वाढे विकत घेण्याची ऐपत नव्हती त्यांनी जनावरे बाजारात मातीमोल भावाने विकली. परिसरात कोणतीही संस्था चारा छावणी चालवण्या इतपत सक्षम नसल्याने प्रस्तावही दाखल होत नव्हते.शेवटी माजी महसूल राज्यमंत्री आ.सुरेशरावजी धस यांच्या मार्गदर्शनाखाली डोंगरकिन्ही जि.प.गटाचे सदस्य अॅड.प्रकाश कवठेकर यांनी डोंगरकिन्ही व कारेगाव येथे छावणीस मंजूरी मिळविली. डोंगरकिन्ही जवळच असलेल्या तुपेवाडी येथे पाण्याची टंचाई असताना ही त्या वर मात करण्यात आली.नानासाहेब तुपे यांनी उन्हाळी पिकांना छाट देऊन त्यांच्या विहीरीतुन पाणी उपलब्ध करून दिले.छावणी साठी शेततळे खोदण्यात आले.या शेततळ्यात पाणी साठा उपलब्ध करून जनावरांना २४ तास पाणी उपलब्ध करून देण्यात आले. या वेळी बोलताना जि.प.सदस्य अॅड.प्रकाश कवठेकर म्हणाले की छावणी चालवण्याचा प्रचंड अनुभव असलेल्या व्यंकटेश सेवाभावी संस्थेला कारेगाव व तुपेवाडी येथील छावणीस मंजुरी मिळाली आहे.या पूर्वी या संस्थेने उखंडा, वैद्यकिन्ही, सोनेगाव या माझ्या मतदारसंघात तर दत्तनगर महाजनवाडी या माझ्या मतदारसंघाबाहेर अशा पाच छावण्या यशस्वीरीत्या चालवल्या आहेत.या मुळे शेतकर्‍यांच्या जनावरांना चारा,पाणी कमी पडणार नाही. शासनाच्या निकषानुसार किंबहुना त्या पेक्षा जास्त चांगली सोय जनावरांना देण्यात येईल.तर शेतकरी
नामदेव तुपे म्हणाले की जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला होता.इतके वाढे घेऊन टाकायला आम्हाला परवडत नव्हतं, वाढे ८०० ते १००० रुपये शेकडा झालेत.बरं झालं छावणी सुरू झाली.व नानासाहेब तुपे (व्यवस्थापक)म्हणाले की व्यंकटेश सेवाभावी संस्थेला छावणी सुरु तर करायची होती पण पाण्याचा प्रश्न होता.मी उन्हाळी पीक रद्द करून त्यांना पाणी उपलब्ध करून दिले.माझी तगमग पाहून त्यांनी छावणीच्या व्यवस्थापणाची जबाबदारी माझ्यावर सोपवली.जि.प.सदस्य अॅड.प्रकाश कवठेकर हे शेतकऱ्यांसाठी देवदुतच आहेत.
पहिल्याच दिवशी या छावणीत ३५० जनावरांची नोंद झाली. या परिसरातील जनावरांच्या चारा व पाणी यांचा प्रश्न सोडवुन जि.प.सदस्य प्रकाश कवठेकर हे देवदुता सारखे धाऊन आले. डोंगरकिन्ही येथुन चार किलोमीटर अंतरावरील कारेगाव येथे ही जि.प.सदस्य अॅड.प्रकाश कवठेकर यांच्या हस्ते छावणीचे उद्घाटन करण्यात आले. येथे ३१० जनावरांची नोंद झाली आहे.या छावणी मुळे कारेगाव, कठाळेवाडी, जालन्याची वाडी येथील शेतकर्‍यांच्या जनावरांची सोय झाली आहे. तुपेवाडी येथील छावणीमुळे तुपेवाडी, मांडवेवाडी, म्हस्केवस्ती येथील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असला तरी डोंगरकिन्ही, मिसाळवाडी, मळेकरवाडी, येवले वस्ती (मुंजारवस्ती), येवले वस्ती (खडकडोह), नाळवंडी येथील शेतकऱ्यांना छावणीची आवश्यकता आहे. या पैकी डोंगरकिन्ही व नाळवंडी येथे लवकरात लवकर छावण्या सुरू करण्यात याव्यात अशी मागणी होत आहे. ही छावणी उद्घाटन प्रसंगी भाऊसाहेब तुपे, दत्ता तुपे, हनुमंत येवले चेअरमन, पप्पु मांडावे, बाबाजी तुपे, शेषराव म्हस्के, आर आर येवले, सोपान तुपे, देविदास मांडवे, दौलत मांडावे, तबाजी मांडवे, अशोक वाल्हेकर, बाबा सातपुते, डॉ भागवत जेधे, दत्ता तुपे, नाना तुपे, भागवत दिलीप, येवले, प्रशांत कोळपकर, अरुण ना.येवले, बाळु नामदेव, बाळु जनार्दन, नितीन कल्याण, येवले, सह तुपेवाडी, म्हस्केवस्ती, शिंदेवस्ती, मांडवेवाडी, येथील बहुसंख्यने शेतकरी बांधव उपस्थित होते.

    WhatsApp वर बातम्या हव्यात ?


    बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

    This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.