मुंबई (वृत्तसंस्था) : स्वतः काँग्रेस(आय)चे महाराष्ट्रराज्य प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हे राजीनामा देण्याच्या मनस्थितीत आहेत. पक्षात कोणि ऐकत नसल्याने चव्हाण राजीनाम्याच्या मनस्थितीत असल्याचं सांगण्यात येत आहे. अशोक चव्हाण यांची चंद्रपुरातल्या कार्यकर्त्यांसोबतची ऑडिओ क्लिप वायरल झाली आहे. त्यावरुन अशोक चव्हाण अंतर्गत गटबाजीमुळे वैतागल्याचे दिसून येत आहे.
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे खा. अशोक चव्हाण हे नाराज असून ते राजीनाम्याच्या तयारीत असल्याच्या संदर्भातील त्यांचीच एक क्लिप व्हायरल झाली आहे. मात्र कार्यकर्त्यांचे मनोबल राखणे माझे काम आहे, मी क्लिप ऐकलेली नाही, असे खा.चव्हाण यांनी एका टीव्ही चॅनेलशी बोलताना सांगितले आहे.
चंद्रपूर लोकसभाच्या उमेदवारीवरून नाराज झालेल्या एका कार्यकर्त्यासोबतच्या फोनवरील संभाषणाची एक ऑडीओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. यामध्ये चंद्रपूरच्या उमेदवारीबद्दल चर्चा सुरु असताना चव्हाण हे ‘मी स्वतः राजीनामा देण्याच्या मनस्थितीत’ आहे, असे बोलल्याचा संवाद आहे.
चंद्रपूर लोकसभेसाठी विनायक बांगडे यांना भाजपचे हंसराज अहिर यांच्याविरुद्ध काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली आहे. बांगडे यांच्या उमेदवारीमुळे चंद्रपूरमधील अनेक कार्यकर्ते नाराज झाले आहेत.
[su_audio url=”https://www.athawadavishesh.com/wp-content/uploads/2019/03/ashokchavanclip.mp3″]