अंबाजोगाई (प्रतिनिधी): येथील मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील अंतर्गत तक्रार निवारण समिती आणि राष्ट्रीय महिला आयोग,नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन मंगळवार,दि. 26 मार्च रोजी करण्यात आले आहे.चर्चासत्राचा विषय-“स्त्रियांसमोरील पाणी,आरोग्य व स्वच्छता विषयक आव्हाने आणि शासकीय योजना” हा असून या चर्चासत्रात सामाजिक,सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील संशोधक,अभ्यासक, प्राध्यापक उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.वनमाला गुंडरे व चर्चासत्राच्या समन्वयक डॉ.अहिल्या बरूरे यांनी दिली आहे.
चर्चासत्राच्या उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी डॉ.अशोक मोहेकर (सचिव,शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय, कळंब) तर उद्घाटक म्हणुन सौ.मंगलाताई प्रकाशराव सोळंके यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.तर यावेळी विशेष अतिथी म्हणुन ज्येष्ठ विचारवंत व सामाजिक कार्यकर्ते संदीप बर्वे (पुणे),रमेश बाबुराव आडसकर (प्रमुख,महाविद्यालय विकास समिती), दत्तात्रय ज्ञानोबा पाटील (सदस्य,मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ, केंद्रिय कार्यकारीणी), महाविद्यालय विकास समितीचे सदस्य सर्वश्री बाळासाहेब चव्हाण, डॉ.नरेंद्र काळे,श्रीमती प्रतिभाताई देशमुख आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. चर्चासत्रातील पहिल्या परिसंवाद सत्राच्या अध्यक्षस्थानी डॉ.शुभदाताई लोहिया तर प्रमुख व्याख्यात्या म्हणुन प्राचार्या डॉ.सविताताई शेटे या आपले विचार व्यक्त करणार आहेत.
तसेच चर्चासत्रातील दुसर्या सत्रातील परिसंवादाच्या सत्राचा विषय हा, “स्त्रियांसमोरील पाणी, आरोग्य व स्वच्छता विषयक आव्हाने आणि शासकीय योजना” हा असून या सत्राच्या अध्यक्षस्थानी अॅड.शोभाताई लोमटे तर प्रमुख व्याख्याते म्हणुन अनिकेत लोहिया हे आपले विचार व्यक्त करणार आहेत. चर्चासत्राचा समारोप समारंभ माजी प्रचार्य डॉ.आण्णासाहेब जाधव यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होईल.यावेळी प्रमुख अतिथी म्हणुन सौ.अर्चनाताई रमेश आडसकर तर प्रमुख व्याख्यात्या म्हणुन मनिषा तोकले या आपले विचार व्यक्त करणार आहेत.यावेळी महाविद्यालय विकास समितीचे सदस्य सर्वश्री वसंतराव मोरे,अमर देशमुख,रणजित लोमटे,श्रीपती जोगदंड, सय्यद पाशु करीम यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
तरी राष्ट्रीय चर्चासत्राकरीता अंबाजोगाई शहरातील सामाजिक,सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील संशोधक,अभ्यासक, प्राध्यापक,विद्यार्थी यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.वनमाला गुंडरे व चर्चासत्राच्या समन्वयक डॉ.अहिल्या बरूरे तसेच उपप्राचार्य प्रा.कांतराव गाडे, उपप्राचार्य डॉ.दिनकर तांदळे,उपप्राचार्य प्रा.भगवान शिंदे आदींनी केले आहे.
==============