अंबाजोगाई (प्रतिनिधी): अखिल भारतीय मराठा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष,माथाडी कामगारांचे आराध्य दैवत व मराठा आरक्षणासाठी आपल्या प्राणांचे बलीदान देणारे कै.आ.अण्णासाहेब पाटील यांना त्यांच्या 37 व्या पुण्यतिथीनिमित्त बीड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने विनम्र अभिवादन करण्यात आले.
अंबाजोगाई शहरातील आण्णसाहेब पाटील चौकातील नामफलकाला पुष्पहार अर्पण करून बीड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी विनम्र अभिवादन केले.या प्रसंगी अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष राणा चव्हाण,नगरसेवक अमोल लोमटे, नगरसेवक सुनिल व्यवहारे,नगरसेवक धम्मा सरवदे,योगेश्वरी पतसंस्थेचे चेअरमन माणिकराव वडवणकर, सुधाकर टेकाळे, जावेद गवळी,महेबुब गवळी,दिनेश घोडके, भारत जोगदंड,शेख मुक्तार,अशोक देवकर,
शिवाजी कांबळे,बापू कदम,सोशल मीडियाचे शरद मोरे आदींसहीत कार्यकर्ते व पदाधिकारी या प्रसंगी उपस्थित होते.
कै.अण्णासाहेब पाटलांनी माथाडी कामगारांसाठी आयुष्य समर्पित केले -राजकिशोर मोदी
अखिल भारतीय मराठा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष तथा मराठा आरक्षण लढ्याचे जनक म्हणुन ओळखले जाणारे कै.आ. आण्णासाहेब पाटील यांनी माथाडी कामगारांसाठी आपले आयुष्य समर्पित केले. त्यांचे कार्य महाराष्ट्र कदापिही विसरणार नाही.आरक्षणासाठी व माथाडी कामगारांसाठी आपल्या प्राणांचे बलिदान देणारे आग्रणी नेते म्हणुन त्यांच्याकडे पाहिले जाते.त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन.