औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीचे उमेदवार जाहीर होत आहेत,तशी प्रमुख पक्षांना बंडखोरीची लागण होत आहे.काँग्रेसमध्येही बंडाचे वारे वाहत असून.सर्वात मोठे बंड औरंगाबादमध्ये उभे राहिले आहे.काँग्रेसने आमदार सुभाष झांबड यांना तिकीट दिले आहे.मात्र त्यांच्या उमेदवारीला थेट विरोध करत काँग्रेसचे बडे नेते काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार अब्दुल सत्तार यांनी थेट लोकसभा रिंगणात उडी घेतली आहे.
अब्दुल सत्तार यांनी लोकसभेची निवडणूक अपक्ष लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांची समजूत काढण्यासाठी काँग्रेसची धावपळ सुरू झाली आहे. अब्दुल सत्तार यांनी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडे दिला आहे. या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने आग्रह धरला होता.पण नगरची जागा राष्ट्रवादीने सोडली नाही म्हणून काँग्रेसने आपला उमेदवार जाहीर करून टाकला.राष्ट्रवादी काँग्रेसचे इच्छुक उमेदवार सतिश चव्हाण यांनी नाराजी व्यक्त केली आहे.या जागेसाठी राष्ट्रवादीकडून सतिश चव्हाण हे उमेदवारीसाठी प्रयत्न करत होते, मात्र काँग्रेसने ही जागा सोडण्यास नकार दिला.अब्दुल सत्तार यांचे बंड टिकले तर औरंगाबादमध्ये बहुरंगी लढत पहायला मिळेल. शिवसेनेकडून येथे चंद्रकांत खैरे उमेदवार आहेत.तर एमआयएमतर्फे आ. इम्तियाज जलील हे उभे राहणार आहेत.तर आ. हर्षवर्धन जाधव हे देखील निवडणूकीत उभे राहणार आहेत. असे झाल्यास औरंगाबाद येथे बहुरंगी लढत पहावयास मिळेल.