धनंजय मुंडे यांनी साधला बीडमध्ये डॉक्टरांशी संवाद ; निवडणूक विकासावर व्हावी,भावनेवर नाही – धनंजय मुंडे

आरोग्यविषयक समस्या सोडवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस कटीबद्ध

बीड दि २३(प्रतिनिधी) : बीड लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या प्रचारार्थ विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज बीडमध्ये शहरातील डॉक्टरांशी संवाद साधला.

डॉक्टरांच्या अडचणी त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस कटिबद्ध असून जनतेच्या आरोग्यविषयक समस्यांना आम्ही सर्वाधिक प्राधान्य देऊ अशी ग्वाही त्यांनी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची संवाद साधण्यासाठी आयोजित केलेल्या बैठकीत दिली.

यावेळी युवक नेते संदीप भैया क्षीरसागर, माजी आमदार सय्यद सलीम, असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर अनिल बारकुल , सचिव डॉ. विनोद ओस्तवाल , खजिनदार डॉ.अमोल विध्ये, फारूक पटेल, महेबूब शेख, अमर नाईकवाडे, बबनराव गवते, अविनाश नाईकवाडे, प्रशांत चौरे आदी उपस्थित होते.

यावेळी डॉक्टरांच्या वतीने दिलेल्या निवेदनाचा संदर्भ घेत या मागण्या राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यात असतील असे आश्वासन त्यांनी दिले. डॉक्टर हा पेशा नाही ही सेवा आहे. आयुष्यमान सारख्या योजना असताना बजेट वाढवलं नाही आम्ही ते वाढवण्याबाबत जाहीरनाम्यात समाविष्ठ करू असे आश्वासन मुंडे यांनी दिले.

वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टरांच्या मागण्यांवर विधिमंडळात आम्ही सरकारशी भांडलो आहोत. या सेवेत असणाऱ्या लोकांसाठी आमची आत्मीयता आहे असल्याचे त्यांनी सांगितले.

किती दिवस मागासलेपण

किती दिवस बीड जिल्ह्याचा मागासलेपण आपण आपल्या नावासमोर ठेवायचं..? ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून बीड जिल्ह्याची ही ओळख कलंक आहे.बीड जिल्ह्यात विकासाच्या मुद्द्यावर राजकारण झालं नाही भावनिक मुद्द्यावर झालं म्हणून हे बीडचं मागासलेपण असल्याचे ते म्हणाले.

विकासाच्या मुद्द्यावर बीडची निवडणूक झाली पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करतांना बीड जिल्हयाला विकासाच्या दृष्टीने मोठं करण्यासाठी आपलं पाठबळ हवं अशी अपेक्षा व्यक्त केली.

आपला लोकसभेतला प्रतिनिधी डॉक्टर असूनही आपल्या समस्यांकडे त्यांचे लक्ष नाही. देशभर विक्रमी मतदान घेऊन नाव कमावलेल्या बीडच्या खासदाराचं बीडच्या विकासाच्या दृष्टीन योगदान काय..? तर खालून 5 नंबरला असणाऱ्या खासदाराने बीडच्या जनतेचा अवमान केला असल्याचे ते म्हणाले.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.