पालघर दि.२४ : पालघर जिल्ह्याच्या मोखाडामध्ये बसचा अपघात झाला आहे. तोरंगणा घाटात पालघरला येत असताना खाजगी बस २५ फुट दरीत कोसळली आहे.
दुपारी पाऊनेतीनच्या सुमारास हा अपघात झाला. मोखाडा-त्र्यंबकेश्वर रोडवर बस दरीत कोसळली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
#Maharashtra: Death toll rises to 6 in bus accident that occurred near Trimbakeshwar road in Palghar district today. 45 people were injured in the accident. https://t.co/cZwXB4tr13
— ANI (@ANI) March 24, 2019
या बसमध्ये ६ जणांचा मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. तर बस अपघातामध्ये तब्बल ४५ जण जखमी झाली आहेत. जखमींना तात्काळ त्र्यंबकेश्वरमध्ये नजिकच्या स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहीती मिळत आहे.
घटनेची माहिती मिळताच सुरक्षा दल आणि पालघर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.तर मदत करण्याचे काम सध्या सुरू आहे. दरीत कोसळलेली बस सध्या बाहेर काढण्याचे काम सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.