येत्या लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का घसरणार ; दुष्काळी परिस्थितीमुळे मजुरांचे शहराकडे स्थलांतर

सोयगाव (ज्ञानेश्वर धोंडू पाटील): नुकतेच सोळाव्या लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजले असून सर्वच राजकीय पक्ष प्रचाराची धुळवत करत ग्रामीण भाग पिंजून काढत असतांनाच यावर्षीच्या दुष्काळसदृश्य परिस्थिती व मजुरांच्या हाताला काम नसल्याच्या कारणातून हा वर्ग शहराकडे स्थलांतरित झाला आहे.त्यामुळे हा वर्ग पैशाची जुळवाजुळव बघता मतदानाला येणे शक्य नसल्याने त्याचा फटका मतदानाच्या टक्केवारीसोबतच निकालावर परिणाम होणार आहे.
सततच्या गेल्या दोन वर्षांपासून औरंगाबाद व जळगाव जिल्ह्यात पर्जन्यमान घटत गेल्याने दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे.यावर्षी तर शेतकऱ्यांना लागलेला खर्चही निघू न शकल्याने उपासमारीची पाळी आली आहे.पर्यायाने शेतकऱ्यांचा हंगाम संपला तेव्हापासून शेतमजुरांच्या हाताला कामच राहिले नसल्याने व पोटाची खडगी भरण्याची चिंता मजुरांना सतावत असल्याने मजुरांचे जवळपास मोठमोठ्या शहरांकडे कामासाठी स्थलांतर झाले आहे.अशा परिस्थितीत लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या असून मजुर वर्ग कामासाठी बाहेर असल्याने मतदानासाठी अनुपस्थिती राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.त्याचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागात बसणार असून मतदानाची टक्केवारी त्यामुळे कमी होणार हे स्पष्ट असून त्याचा थेट निकालावर परिणाम होणार आहे.सद्या राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातून किती मजुरांचे स्थलांतर झाले याची अधिकृत माहिती जिल्हास्तरीय कोणत्याही कार्यालयाकडे उपलब्ध राहत नसल्याने या मतदानाचा नेमका कसा परिणाम जाणवेल हे शेवटी न उगडलेले कोडेच राहणार आहे.

“मतदान न केल्यास मतदाराच्या बँक खात्यातून ३५० रुपये वजा करण्याच्या बातम्या सध्या सोशल मीडियावर येत असून मतदान टक्केवारीसाठी हे ठीक असले तरी खरोखरच ज्या नागरिकांना पोटाची खडगी भरण्यासाठी मुंबई,पुणे सारख्या मेट्रो सिटीकडे कामासाठी जावे लागते व गावी मतदानासाठी परतण्यासाठी प्रवास खर्चासाठी हजार पाचशे रुपये लागत असतील तर खरोखरच हा वर्ग एवढा खर्च करण्याची ऐपत ठेऊन मतदान करेल का?त्यामुळे ३५० रुपये कटण्याची भीती न ठेवता हे मतदान होण्याची शक्यता कमी राहणार आहे.”

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.