पाटोदा तालुकाब्रेकिंग न्युज

राष्ट्रवादीने निवडणुकीत किती ही ऊसणे आवसान आणले तरी डॉ.प्रितमताई मुंडे यांचा विजयी रथ कोणी रोखू शकत नाही―अॅड.सुधीर घुमरे

पाटोदा (शेख महेशर): बीड लोकसभा मतदार संघातील निवडणुकीचे बिगुल वाजले असुन दि.२५ मार्च २०१९ सोमवारी भा.ज.पा., शिवसेना, रि.पा.ई, रा.स.पा. महायुतीच्या उमेदवार डॉ.प्रितमताई मुंडे यांचा उमेदवारी अर्ज भव्य शक्ती प्रदर्शन करुन दाखल होणार आहे.तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे नवखे उमेदवार बजरंग सोनवणे यांची प्रचारा मध्ये राष्ट्रवादीची घडी गटबाजीने विस्कटलेली दिसत आहे.बीड जिल्हयाच्या जिव्हाळयाचा प्रश्न नगर बीड परळी रेल्वेमार्गासाठी २८०० कोटी रुपयाची भरीव तरतुद सरकार च्या माध्यमातुन करुन बीडची रेल्वे सोलापुरवाडीत पर्यत आली आहे.त्या मुळे रेल्वेची जिल्हावासीयाची स्वप्नपुर्ती साकार होत आहे.जिल्हयात केंद्र सरकारच्या माध्यमातुन अनेक राष्ट्रीय महामार्गाचे जाळे विनण्याचे काम डॉ.प्रितमताई मुंडे यांनी केले आहे.तसेच बीड मधील पहिले पासपोर्ट कार्यालय उभारुन जे काँग्रेस राष्ट्रवादीला पन्नास वर्षात जमले नाही ते करुन दाखवले तसेच गोरगरीबासाठी विनामुल्य महाआरोग्य शिबीर घेऊन रुग्नांना आधारवड झाले आहे.मोतीबिंदु शिबीर घेऊन गरीब रुग्णांना दृष्टी देण्याचे काम केले आहे.हे सुज्ञ जनता जानुन आहे.परंतु राष्ट्रवादीचे डझन भर मंत्री आमदार यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत मुंडे साहेबांना पराभूत करण्याचे दिव्य स्वप्न बधितले.परंतु बीड जिल्हयातील जनतेने स्वाभीमानाने लोकनेते मुंडे साहेबांना विक्रमी मताने विजयी केले.त्यांचा वारसा डॉ.प्रितमताई मुंडे सक्षमपणे चालवत आहे . राष्ट्रवादीचे नेते प्रचारात जातीयवादाचे विष पेरत आहेत . व सोनवणे सर्व सामान्य शेतकरी उमेदवार असा गवगवा करीत आहे.परंतु ३०० कोटी रुपयाचा कारखाना आणी २५ कोटी रुपये गुत्तेदारीचे कामे करणारा कोणता गरीब शेतकरी उमेदवार आहे. हे हास्यास्पद आहे आहे.राष्ट्रवादीने बजरंग सोनवणे यांना उमेदवारी घोषीत करुन ही निवडणुक एकतर्फी भाजपा च्या पारड्यात टाकून दिली आहे. बीड जिल्हा विकासा कडे घेऊन जाण्याचे काम डॉ.प्रितमताई मुंडे यांनी केले आहे. त्या मुळे पुन्हा एकदा किती ही उसने आवसान राष्ट्रवादीने निवडणुकीत आणले तरी डॉ.प्रितमताई मुंडे या विक्रमी मताने निवडून येणार आहेत. त्याचा विजयी रथ कोणी ही रोखू शकत नाही.असे प्रसिद्धी पञक भाजपा पाटोदा तालुका अध्यक्ष अॅड.सुधीर घुमरे यांनी काढले आहे.

    WhatsApp वर बातम्या हव्यात ?


    बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

    This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.