पाटोदा (शेख महेशर): ह.भ.प डॉक्टर गोरे रवींद्र पाटोदा येथे बोलताना डॉक्टर गोरे यांनी सांगितले की युवकांनो पुढार्याच्या पाठीमागे फिरवून व्यर्थ वेळ घालवण्यापेक्षा छोटा मोठा का होईना व्यवसाय उद्योगधंद्या कडे तुम्ही वळा, चांगल्या पुढार्यांना सलाम त्यांच्यामुळे काही उद्योग धंदे निर्माण झाली असल्यामुळे काही लोकांना व्यवसाय मिळत चाललेला आहे, गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी बँके मार्फत पुढाऱ्यांनी व्यवसायासाठी लोन उत्पन्न करून दिले पाहिजे त्याने उद्योग भरभराटीस लागतील, गोरगरीब विद्यार्थ्यांना स्वावलंबी बनन्याचा मार्ग सापडेल, डॉ.गोरे यांनी सांगितले, व्यवसायाच्या मार्फत तुमच्या आई वडिलांचं नाव उज्वल करा तुमच्या शिक्षकाचं नाव उज्वल करा तुमच्या गावाचे तालुक्याचे जिल्ह्याचे राज्याचे आणि देशाचे नाव जगात उज्वल करा ,तुम्ही जर ठरवलं तर सर्व काही शक्य होऊ शकते,पण तुम्ही ठरवलं पाहिजे तुम्ही प्रयत्न केला पाहिजे ,प्रयत्न केल्यास कोणतीही गोष्ट अशक्य नाही असे डॉक्टरांनी सांगितले ,तुम्ही व्यवसायाकडे वळला तर तुमच्या हाताखाली नक्कीच दोन-चार तरी नौकर तुमचा हाताखाली काम करतील, त्यांच्याही रोजगाराची सोय होईल ,चांगल्या पुढाऱ्याकडून गावच्या विकासाच्या योजना समजून घ्या व गावाच्या विकासासाठी हातभार लावा ,आपल्या गावाचा विकास झाला पाहिजे, माझं पुढारी लोकांना एक सांगावे वाटतं की गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक गावा मध्ये किमान एकदा तरी छोटा वाचनालयाचा हॉल उघडावा, जेणे करून त्या वाचनालय मध्ये जावुन ही पिढी आपलं भवितव्य घडवेल, अभ्यास करून नक्कीच मोठे होतील, तुम्ही व्यवसाय करून सर्वांचे मनोभावे सेवा करा, तुम्हाला ईश्वर कमी पडू देणार नाही, जिव वोतून काम करा यश तुमच्या पदरात आपोआप पडेल ,कोणतीच गोष्ट अशक्य नाही, तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे प्रयत्न करता ” वाळूचे कण रगडीता तेलही गळे…” तुम्ही जर प्रयत्न केला तर तुम्ही एक दिवस नक्कीच यशाचे शिखर गाठू शकता, तुम्ही नाही प्रयत्न केला तर तुम्ही काहीच करू शकत नाही, म्हणून पहिल्यांदा प्रयत्न करा यशस्वी नक्कीच होताल, असे डॉ. गोरे यांनी सांगितले विद्यार्थ्याला सायकल देताना डॉ. रविंद्र गोरे म्हणाले त्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना सांगितले की खूप मोठा हो, खूप शिकून मोठा झाल्यानंतर आपल्या आई-वडिलांची गावाची देशाची सेवा कर तुझ्या जीवना मध्ये ३ गरजू लोकांना मदत कर, समाजा मध्ये एक वेगळा ठसा निर्माण कर असं डॉ.गोरे यांनी सांगितले ३१ वी सायकल देताना बोलत होते. जर कुणाकडे सायकल असेल तर माणुसकीची भिंत चे दत्ता देशमाने यांच्या कडे सायकली द्या त्या सायकली गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी देण्यात येतात,”दत्ता देशमाने यांचा मोबाईल नंबर ९२७२५२२८९३” गोरगरिबाचा फायदा केला, सहकार्य केलं तर नक्कीच ईश्वर आपल्याला अनंत पटीने आशीर्वाद देत असतो, म्हणून प्रत्येकाने गोरगरिबांसाठी नेहमी सहकार्याची भावना ठेवली पाहिजे असे ह.भ.प.डॉ.रविंद्र गोरे यांनी सांगितले. या वेळी पत्रकार शेख महेशर, दत्ता वाघमारे, रामदास भाकरे, भोसले भाऊ, बाबासाहेब गर्जे(बापु), कल्याण शेठ खंडागळे, शेख जमीर भाई, दिलीप जाधव,यांच्या सह इतर नागरिक उपस्थित होते.