गंगाखेड (प्रतिनिधि): छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासकालीन आठवणी आणि स्मृती जोपासून छत्रपतींच्या इतिहास आणि कार्यातून प्रेरणा घेऊन शिक्षणाबरोबरच संस्कार,चारित्र्य आणि शौर्याचा ऐतिहासिक ठेवा मनात रुजवावा असे प्रतिपादन शिवव्याख्याते प्रा. मारोती बुद्रुक पाटील यांनी केले.
कौवडगाव ता. गंगाखेड येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने सह्याद्रीच्या कुशीत रडतोय शिवरायांचा इतिहास या विषयावर प्रा मारोती बुद्रुक पाटील यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाबासाहेब जामगे, उद्घाटक दत्तगिरी महाराज मर्डसगांवकर,
खासदार संजय बंडु जाधव,माजी नगराध्यक्ष रामप्रभू मुंढे, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती बाळासाहेब, सखूबाई लटपटे, राजेश बडवणे,भास्कर काळे, प्रा.विजय बाबर प्रा.सोपान बाबर, संजय सुपेकर,शिवसेना नेते भाऊसाहेब जामगे, शिवसेना तालुकाप्रमुख अनिल सातपुते, राजश्री जामगे,संगीता जामगे, ह.भ.प.बालासाहेब कतारे महाराज, यशवंत इंगळे,माजी सभापती मंजुषा जामगे, रोहित जामगे, नंदकुमार सुपेकर,रामेश्वर दुधाटे, आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना बुद्रुक पाटील म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासकालीन आठवणी आणि स्मृती जोपासून छत्रपतींच्या इतिहास आणि कार्यातून प्रेरणा आजच्या युवकांनी घ्यायला हवी शिवरायांची प्रतिमा डोक्यावर घेऊन नाचण्यापेक्षा शिवरायांचा इतिहास युवकांनी आपल्या डोक्यात घ्यावा शिवरायांनी स्वतःच्या शिवकालीन व्यवस्थापनामध्ये स्त्रियांचा आदर सन्मान, कडक शिक्षा, शत्रूपासून सावधपणा, रयतेच्या रक्षणासाठी गडकोट किल्ले, शत्रूवर नजर ठेवण्यासाठी आरमार, शेतीसाठी पाणी व्यवस्थापन हे सर्व फक्त शिवबाने केले विश्वात शिवरायांच्या जीवन चरित्र सारखे दुसरे चरित्र अजूनही वाचायला मिळत नाही.हिमालयासारखा तेजस्वी शिवरायांचा इतिहास युवकांनी आपल्या डोक्यात घेतला तर येणाऱ्या भविष्यकाळात परत सुराज्य निर्माण करता येईल परंतु आजची तरुण पिढी व्यसनाधीन होऊन संस्कारहीन होत चालली आहे आई-वडिलांनी बालवयातच मुलावर जिजाऊ माँ सारखे संस्कार करावे लागतील तरच घरात शिवबा जन्माला येईल असे प्रतिपादन प्रा. मारोती बुद्रुक पाटील यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अजय कुमार सुपेकर यांनी केले.सूत्रसंचालन ऋषिकेश जामगे यांनी तर आभार शिवानंद भिसे यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिवजयंती मंडळाचे अध्यक्ष अविनाश जामगे, उपाध्यक्ष संदीप वडजे, कोषाध्यक्ष चेतन दुबे, सचिव मारुती जामगे, मार्गदर्शक शिवानंद भिसे, शैलेश वडजे, मारुती देवकते, अच्युत जामगे, बालाजी जामगे, वैजनाथ वडजे, कैलास जामगे आदींनी यशस्वी प्रयत्न केले.