बीड/प्रतिनिधी: आज संपूर्ण राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात कोरोनाचे संकट घोंगावत आहे त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्याचे पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय विकास क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार साहेब यांना ई-मेल द्वारे निवेदन सादर करत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की राज्यातील भटकंती करणाऱ्या धनगर समाजातील मेंढपाळांना दहा हजार रुपये आर्थिक मदत जाहीर करून रानावनामध्ये आणि डोंगर-दर्यांमधे भटकंती करून आपली उपजीविका भागवणाऱ्या धनगर समाजातील मेंढपाळांना तात्काळ दहा हजार रुपये आर्थिक मदत जाहीर करावी त्याच बरोबर सध्या परिस्थिती पाहिली तर आठवडी बाजार चालू नसल्याने मेंढपाळांना त्यांच्या मेंढ्यांना व्यवस्थित भाव मिळत नाही अशा परिस्थितीत मेंढपाळांचा आर्थिक कणा कोलमडला असून दररोज पोटासाठी भटकंती करत असताना मेंढपाळांना त्यांच्या असलेल्या मेंढ्यांना चारा व माणसांना पुरेशा अन्नधान्य मिळणे कठीण आहे रानावनात फिरताना अनेक अडचणीचा सामना करावा लागतो अनेक अडचणींना सामोरे जावे लागते महिला व मुलांच्या आरोग्याची परिस्थिती पैशाअभावी बिकट होताना दिसत आहे मेंढपाळ हा या जिल्ह्यातून त्या जिल्ह्यात अशी भटकंती करत आहे परंतु या खूप मोठ्या महामारी मध्ये महाराष्ट्र सरकारने आणि राज्याचे पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय विकास क्रीडा व युवक कल्याण मंत्री महाराष्ट्र राज्य सुनील केदार यांना ई-मेल द्वारे निवेदन सादर केले आहे निवेदनात पुढे म्हटले आहे की प्रत्येक छोट्या छोट्या समूहाला पण त्या अगोदर मदत जाहीर केली आहे परंतु मेंढपाळांच्या समस्या मात्र या सरकारला दिसत नाहीत काय? असा वाकसे यांनी सवालही दिलेल्या निवेदनात त्यांनी केला आहे पुढे ते म्हणाले की तात्काळ भटकंती करणार्या आणि मेंढपाळ व्यवसायावर जगणाऱ्या धनगर समाजातील मेंढपाळांना तात्काळ दहा हजार रुपये आर्थिक मदत जाहीर करावी त्याच बरोबर त्यांच्या आरोग्याचा प्रश्नही महाराष्ट्र सरकारने सोडवावा असे निवेदन ई-मेल द्वारे राज्याचे पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री सुनील केदार साहेब यांना ई-मेल द्वारे सादर केले आहे आणि जर का आपण या निवेदनावर कारवाई केली नाही तर आम्ही मेंढपाळांना घेऊन भीक मागो आंदोलन करणार आहेत असे देखील दत्ता वाकसे त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.