कडा:शेख सिराज(प्रतिनिधी)― कडा येथिल सामाजिक कार्यकर्ते सय्यद रहेमान सय्यदअली हे गेली अनेक वर्षापासून करीत असलेल्या सामाजिक कार्याची व त्यासाठी केलेली उपोषणे,आंदोलने यांची दखल घेत भ्रष्टाचार निर्मुलन समितीच्या आष्टी तालुका अध्यक्ष पदी भ्रष्टाचार निर्मुलन समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष तात्यासाहेब उदगुडे,उपाध्यक्ष शांताराम खुडे,मराठवाडा अध्यक्ष इंजि.सादिक ईनामदार यावरिष्ठांच्या आदेशानुसार भ्रष्टाचार निर्मुलन समितीचे बीड जिल्हाध्यक्ष डाँ. गणेश ढवळे यांनी नियुक्ती पत्र देऊन निवड केली.या निवडीचे सर्वस्तरातुन स्वागत करण्यात येत आहे.