सोलापूर दि.२५: आज सोलापूरात रंगपंचमी उत्साहात सुरु असून सोबतच लोकसभेच्या उमेदवारांची अर्ज दाखल करण्याचा उत्साह ही तितकाच आहे. बहुजन वंचित आघाडीचे उमेदवार प्रकाश आंबेडकर आपले उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानातील डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन मिरवणुकीने मार्गस्थ झाले आहे.
या मिरवणुकीत वंचित बहुजन आघडीच्या सर्व पक्षातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. तसेच उपस्थितांनी प्रकाश आंबेडकर यांचा जयघोष करीत निळ्या व हिरव्या रंगाची उधळण करीत आहेत.