पाटोदा (शेख महेशर): माजी आ. स्व. लक्ष्मणराव जाधव ( तात्या) यांचे पुत्र भीमराव लक्ष्मणराव जाधव यांचे आज सोमवारी दुपारी चार वाजता राहत्या घरी आजाराने निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय ५८ वर्ष होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, तीन मुली, भाऊ, पुतणे असा मोठा परिवार आहे. त्यांच्यावर दि.२६ मार्च रोजी मंगळवारी सकाळी नऊ वाजता माजंरसुबा रोड वरील त्यांच्या जानपिराच्या शेतात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
भीमराव जाधव हे गेल्या काही महिन्यांपासून स्वादू पिंडाचा आजाराने त्रस्त होते. गेल्या तीन महिन्या पूर्वीच त्यांच्या वडिलांचे निधन झाले होते. त्यांच्या निधनाने पाटोदा शहर व तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
भीमराव जाधव यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकध्यक्ष, रोहयो कमेटीचे अध्यक्ष पद भूषविले आहेत. मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे ते सदस्य होते. बलभीम महाविद्यालय बीडचे स्थानिक कमिटीचे ते सदस्य होते. एक शांत सुस्वभावी व्यक्ती म्हणून तालुका भरात परिचित होते. परिसरात मामा या नावाने ओळखले जात होते. आठवडा विशेष परीवार जाधव कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे.