कोरोना संकटकाळात अंबाजोगाई नगरपरिषदेची सातत्यपूर्ण सेवा ,कोविड रूग्णालय व कोविड केयर सेंटरला सर्वोतोपरी सहकार्य

अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम―
कोरोना सारख्या साथरोगावर नियंत्रण मिळविण्यासाठी राज्यातील महाविकास आघाडी सरकार हे विविध उपाययोजना आखत कोरोनामुक्तीसाठी यशस्वी प्रयत्न करीत आहे.सरकारच्या या प्रयत्नांना उत्तम प्रतिसाद देवून कोरोना संकटकाळात विविध माध्यमातून उपाययोजना राबविण्यासाठी अंबाजोगाई नगरपरिषद सातत्यपूर्ण सेवा देऊन प्रयत्न करीत आहे. लोखंडी सावरगांव येथील कोविड रूग्णालय व शहरातील अन्य कोविड केयर सेंटरला अंबाजोगाई नगरपरिषदेकडून सर्वोतोपरी सहकार्य करण्यात येत आहे.

कोरोना संसर्गाचा वेग जास्त असल्याने प्रादुर्भाव वाढत आहे.अशा कठीण परिस्थितीत अंबाजोगाई
नगरपरिषदेने विविध माध्यमातून कोरोना सारख्या महामारीचा संसर्ग वाढू नये याबाबत सर्व प्रशासकीय यंत्रणेशी योग्य समन्वय साधून विविध उपाययोजना केल्या आहेत.जिल्हाधिकारी रविंद्र जगताप,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांचे मार्गदर्शनाखाली अप्पर जिल्हाधिकारी मंजुषा मिसकर,पोलिस अधिकारी सुनिल जायभाय,उपजिल्हाधिकारी शरद झाडके, तहसिलदार विपीन पाटील,प्रभारी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी,स्वारातीचे अधिष्ठाता डॉ.शिवाजी सुक्रे,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.बालासाहेब लोमटे, मुख्याधिकारी अशोक साबळे,नगरसेवक बबनराव लोमटे, नगरसेवक कमलाकर कोपले तसेच सर्वपक्षीय नगरसेवक आणि नगरपरीषदेचे अधिकारी,कर्मचारी वर्ग हा जनजागृती व समन्वयातून एकञितपणे काम करीत आहे.

*कोरोनामुक्तीसाठी अंबाजोगाई नगरपरिषदेचे प्रयत्न*
====================
कोरोना सारख्या संसर्गजन्य साथरोगावर नियंत्रण मिळविण्यासाठी राज्यातील महाविकास आघाडी सरकार विविध उपाययोजना आखत कोरोनामुक्त करण्यासाठी यशस्वी प्रयत्न करीत आहे. सरकारच्या या प्रयत्नांना उत्तम प्रतिसाद देवून कोरोना संकटकाळात विविध माध्यमातून तसेच प्रभारी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी यांचे मार्गदर्शनाखाली उपाययोजना राबविण्यात अंबाजोगाई नगरपरिषद सातत्याने
प्रयत्न करीत आहे.जिल्ह्यासह अंबाजोगाई शहर व तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत आहे.कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी अंबाजोगाई नगरपरिषदेने पुढाकार घेऊन शासनाच्या उपाययोजना,जिल्हा व तालुका प्रशासनाचे प्रयत्न आणि सुचनांचे नागरिकांनी पालन करावे यासाठी आरोग्य व कोरोना विषयक जनजागृती, प्रबोधन करण्यात येत आहे.कोरोना नियंत्रणासाठी नियमित स्वच्छता, पाणी पुरवठा,शासन निर्देशानुसार ज्या कार्यालयात बाधित कर्मचारी आढळून आले ती शासकीय कार्यालये,ज्या शाळेत परीक्षा होत्या अशा शाळा,या सोबतच ज्या कुटुंबात बाधित रूग्ण आढळून आले तेथील राहते घर व निवासी जागा येथे सॅनिटायझर फवारणी केलेली आहे.

*अंबाजोगाई नगरपालिकेकडून १० लाख ५० हजार लिटर एवढा पाणी पुरवठा*
====================
अंबाजोगाई नगरपालिकेकडून
टी.बी.गिरवलकर कॉलेज सी.सी.यांना ४०० गाद्या,४३० उशा,४०० चादरी,४० मोठे डस्टबीन,१५० छोटे डस्टबीन,१५ नविन पाणी जार,६० मोठी बकेट,४९ छोटी बकेट,७१ मग,२४ वायपर,२२ पोछा,४२ टॉयलेट ब्रश तसेच आवश्यकतेनुसार मास्क व सॅनिटायझर आणि स्वच्छता विषयक पूर्ण साहीत्य देण्यात आले आहे.तसेच पाण्याचे जारद्वारे पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून देण्यात आले आहे.मागील वर्षीही २०० गाद्या,२०० उशा,२०० चादरी यासह आवश्यकतेनुसार मास्क व सॅनिटायझर आणि स्वच्छता विषयक पूर्ण साहीत्य देण्यात आले.लोखंडी सावरगाव कोविड सेंटर,टी.बी.गिरवलकर कॉलेज सी.सी.,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर मुलांचे वसतीगृह येथील कोविड केअर सेंटरच्या स्वच्छतेसाठी दररोज २ घंटागाड्या कार्यान्वित आहेत.दिवसातून दोन वेळेस त्याच बरोबर एक दिवसाआड प्रमाणे ट्रॅक्टरही स्वच्छतेसाठी उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.दिनांक २८ मार्च २०२१ रोजी पासून कमी अधिक प्रमाणात आवश्यकतेनुसार दररोज टँकरद्वारे नियमीतपणे पाणी देण्यात येते.दिनांक २८ मार्च २०२१ रोजी पासून ते २६ एप्रिल २०२१ या कालावधीत टँकरच्या १२७ खेपांद्वारे तब्बल १० लाख ५० हजार लिटर एवढा पाणी पुरवठा करण्यात आला असून मागील ४ दिवसांपासून लोखंडी सावरगांव येथील कोविड केअर रूग्णालयास पाईप लाईनद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे.,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर मुलांचे वसतीगृहाची पूर्णपणे स्वच्छता करून तिथे सॅनिटायझर फवारणी करण्यात आली,तसेच दररोज नियमीत घंटागाडीद्वारे येथील कचरा संकलीत करण्यात येतो,नगरपरिषदेमार्फत पाणी पुरवठा करण्यात येत आहे.गरजेनुसार एल.ई.डी.बल्ब बसविण्यात येवून विद्युत व्यवस्था करण्यात आलेली आहे.या सोबतच मागील एक वर्षांपासून ते २६ एप्रिल २०२१ या कालावधीत शासन निर्देशानुसार ५३७ मयत कोरोना बाधित रूग्णांच्या पार्थिवावर अंबाजोगाई नगरपरिषदेकडून अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.

अंबाजोगाईकरांचे सहकार्य व एकजुटीने कोरोना संकटावर मात करता येईल

अंबाजोगाई हे मराठवाड्याचे पुणे म्हणून ओळखले जाते.सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर असणा-या या शहरात कोरोना संकटकाळात
आरोग्य,पोलिस,महसूल विभाग ही शासकीय कार्यालये, अंबाजोगाईकर जनता,स्वयंसेवी व सामाजिक संस्था, पञकार बांधव,रोटरी क्लब,वकील संघ, व्यापारी बांधव आणि अंबाजोगाई नगरपरिषदेचे सर्वपक्षीय नगरसेवक, नगरसेविका,मुख्याधिकारी,प्रशासन,स्वच्छता व पाणी पुरवठा विभागातील कर्मचारी यांचे एकञित सामुहिक प्रयत्नांमुळे अंबाजोगाईसह संपूर्ण मानवांवरचे कोरोना संकट लवकरच दूर होईल अशी प्रार्थना करूयात,अंबाजोगाईकरांनी मास्क व सॅनिटायझरचा नियमित वापर करून,गर्दीत जाणे टाळून,आपले हात नियमितपणे स्वच्छ धुवावेत,लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबविण्यात यावी आणि कोरोना पार्श्‍वभूमीवर शासन निर्देशांचे व कायद्याचे पालन करावे.तर नक्कीच यश मिळेल. या पुढील काळात ही अंबाजोगाईतील सर्वच घटकांनी आरोग्य,पोलिस,महसूल व सर्व शासकीय यंञणा तसेच नगरपरिषदेस असेच सहकार्य करावे.
―राजकिशोर मोदी (प्रभारी नगराध्यक्ष,न.प.अंबाजोगाई.)