औरंगाबाद : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना कडून औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघासाठी जय भगवान महासंघाचे अध्यक्ष बाळासाहेब सानप यांचे नाव राजकीय वर्तुळात पुढे येत आहे.त्यांनी केलेल्या समाजकार्याची व शिवसेनेशी एकनिष्ठतेची पावती म्हणून शिवसेना बाळासाहेब सानप यांना आमदारकिला उभा करणार असल्याचे खास सुत्रांमार्फत सांगण्यात येत आहे.बाळासाहेब सानप यांच्या पत्नी नारेगाव वार्डच्या नगरसेविका आहेत.महापालिकेच्या माध्यमातून त्यांनी सामान्यांचे प्रश्न सोडवण्याचे काम आजवर केले आहे.
औरंगाबाद लोकसभा निवडणुकीत देखील शिवसेनेच्या उमेदवारासाठी सानप यांनी मोठे कष्ट घेतल्याचे सांगण्यात येत आहे.त्यांच्या या कामाची पावती म्हणून विधानसभेचे टिकीट सानप यांना मिळण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
कोण आहेत बाळासाहेब सानप ?
जय भगवान महासंघाचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब सानप यांनी आजवर आपल्या संघटनेच्या माध्यमातून संघटनेच्या कार्यकर्त्यांचे प्रश्न,सर्वसामान्य जनतेच्या सुख दुःखात सहभाग,संघटनेच्या माध्यमातून आंदोलने इत्यादी कार्य केलेले आहेत.औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयावर लाखोंच्या संख्येने दुष्काळी मोर्चा,मुंबई येथे झालेल्या टॅक्सी मालक चालक मोर्चा चे नेतृत्व देखील बाळासाहेब सानप यांनी केलेले आहे.त्यामुळे त्यांच्यामागे कार्यकर्त्यांची मोठी फळी आहे.