मद्यधुंद लिपिक कैलास अनभुले कडून पत्रकारास विनाकारण शिवीगाळ , पोलीस प्रशासनाच्या कारवाई कडे लक्ष ?

अवैध दारूमुळे पत्रकारांसह सामान्यांना त्रास – डॉ ढवळे

पाटोदा दि.०३:आठवडा विशेष टीम― भर कोरोना काळात मद्य ढोसून पत्रकाराला शिव्या देण्याचे घाणेरडे कृत्य बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील धनगरजवळका गावातील श्री जगदंबा विद्यामंदीर येथील लिपिक कैलास बाबुराव अनभुले याने शनिवार दि.०१ मे २०२१ च्या रात्री ९.३० वाजताच्या सुमारास केले आहे.अशा शिवीगाळ करणाऱ्या प्रवृत्तीचा वावर जास्त वाढल्यामुळे पत्रकारांना भर कोरोना काळात पत्रकारितेच्या माध्यमातून जनतेची सेवा करता येत नाही.पोलीस प्रशासनाने देखील याकडे लक्ष दिले पाहिजे व तात्काळ कारवाई केली पाहिजे.

सविस्तर वृत्त असे की ,पाटोदा तालुक्यातील पत्रकार नानासाहेब डिडुळ यांना शनिवारी रात्री धनगरजवळका येथील कैलास अनभुले नामक लिपिकाने मद्य प्राशन करून रात्री साडेनऊ च्या आसपास तब्बल एक ते दिड तास शिविगाळ केली आहे.पोलीस प्रशासन या गोष्टीला गांभिर्याने घ्यावे व अशा इसमाविरुद्ध कडक कायदेशीर कारवाई करावी जेणेकरून पुन्हा अशाप्रकारच्या घटना घडणार नाहीत.

जिल्ह्यातील अवैध दारूमुळे सामान्यांना नाहक त्रास – डॉ गणेश ढवळे

पाटोदा तालुक्यातील अवैध दारू विक्री पोलीस प्रशासनाने तात्काळ बंद करावी यासाठी पोलीस अधीक्षक बीड, जिल्हाधिकारी बीड यांना डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर सामाजिक कार्यकर्ते तथा भ्रष्टाचार निर्मूलन समिती जिल्हाध्यक्ष बीड यांनी केली असून दारू विक्रीमुळे सर्वसामान्य माणसांना दारूड्यांचा नाहक मानसिक त्रास सहन करावा तर लागतोच परंतु त्यामुळे कोरोना संसर्ग पसरण्याचा धोका सुद्धा आधिक वाढला आहे, त्यामुळेच संबधित प्रकरणात कठोर कारवाई करण्यात यावी
– डॉ गणेश ढवळे

पोलीस स्टेशन चे बिट अंमलदार यांनी दिला पोस्टाने तक्रार करण्याचा सल्ला

बीट अंमलदार आदीनाथ तांदळे यांच्या कडे तक्रार देण्याकरता गेले असता त्यांनी पोस्टाने तक्रार करा असा सल्ला दिला
– नानासाहेब डिडुळ

शिविगाळ खपवून घेणार नाही – सचिन मेघडंबर

माझ्या अनुसुचीत जातीच्या लोकांना कोणी विनाकारण शिवीगाळ केली तर खपऊन घेणार नाही अॅट्राशिटी अॅक्ट नुसार कारवाई करण्यात येईल.
― सचिन मेघड़ंबर (वंचित बहुजन आघाडी महासचिव बीड़ जिल्हा)