पाचोरा दि.२७ (ज्ञानेश्वर धोंडू पाटील): तालुक्यातील नगरदेवळा येथे माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली असून एका ३६ वर्षीय वासनांध नराधमाने तीन वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला आहे. दिनांक २६ मार्च रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास आरोपीने हे निंदनीय कृत्य केले असून या घटनेनंतर नगरदेवळा परिसरात संतप्त भावना उमटत असतानाच पाचोरा पोलिसांनी आरोपीला काही तासातच अटक केली आहे.
याबाबत सविस्तर असे की नगरदेवळा गावातील आरोपी किशोर निंबा भोई वय ३६ याच्या घराशेजारी राहणाऱ्या एका कुटुंबात तीन वर्षाच्या चिमुकल्या बालिकेस या नराधमाने चॉकलेट देण्याच्या बहाण्याने घरात बोलावून घेतले दुपारी दोन वाजेच्या सुमारास आरोपीच्या घरी कुणीही नसताना त्याने या बालिकेवर बलात्कार केला या घटनेमुळे काही वेळाने सदरची बालिका रडायला लागल्या मुळे तिची आई घटनास्थळी धावत आल्याने घटनेचा उलगडा झाला त्यानंतर मुलीच्या आई वडील व नातेवाईकांनी पोलीस स्टेशन गाठून घटनेची माहिती दिली त्यानुसार पोलिसांनी तत्पर कारवाई करत आरोपीला ताब्यात घेऊन पाचोरा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अमित साळुंखे यांचेकडून अत्याचारग्रस्त मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे दरम्यान या मुलीला पुढील तपासणी व उपचारासाठी जळगाव सामान्य रुग्णालयामध्ये रवाना करण्यात आले आहे या प्रकरणी पाचोरा पोलीस स्टेशनला आरोपीविरुद्ध बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा तसेच बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.
संभाजीनगर येथे १३ वर्षीय तरुणीच्या विनयभंगाचा प्रयत्न
नगरदेवळा येथे बलात्काराची संतापजनक घटना घडलेली असताना शहरातील संभाजीनगर येथे एका चाळीस वर्षीय वासनांध विकृत इसमाने १३ वर्षीय बालिकेचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. प्रसंगी शेजारी राहणाऱ्या एका महिलेच्या दक्षतेमुळे शहरातील बलात्काराची दुसरी घटना टळल्याचे समोर आले आहे