‘मिशन शक्ती’ यशस्वी, अंतराळातील महाशक्ती म्हणून भारताचा उदय – नरेंद्र मोदी

नवी दिल्ली(वृत्तसंस्था): आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदीआज देशाला संबोधित केले. भारतीय शास्त्रज्ञांनी क्षेपणास्त्राच्या मदतीने अंतराळातील उपग्रह पाडण्यात यश मिळवले असून, ऑपरेशन शक्ती अंतर्गत करण्यात आलेल्या या यशस्वी प्रयोगामुळे भारत हा अंतराळात मारा करू शकणारा अमेरिका, रशिया, चीन नंतरचा भारत हा चौथा देश बनला आहे.

“हा देशासाठी सर्वांत महत्त्वपूर्ण क्षण आहे. आपल्या सॅटेलाइटचा फायदा सर्वांनाच होत आहे. यापुढे अंतराळ आणि सॅटेलाइट चे महत्त्व वाढत जाणार आहे. अँटी सॅटेलाइट – ‘A-SAT’ मिसाईल ही देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. भारताने नवी क्षमता प्राप्त केली आहे ती देशाच्या सुरक्षेसाठी आहे. भारताचे हे परीक्षण कुणाच्या विरोधात नाही. आजची चाचणी ही कोणत्याच आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन करणारी नाही, असे नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले आहे.

  • केवळ तीन मिनिटांत उपग्रह पाडला, डीआरडीओच्या शास्त्रज्ञांची कामगिरी.
  • मिशन शक्तीअंतर्गत क्षेपणास्त्राच्या सहाय्याने उपग्रह पाडण्यात यश, या अभियानाच्या यशस्वीतेमुळे भारत अंतराळात महाशक्ती बनला आहे.
  • भारत आज अंतरिक्ष महाशक्ती बनला आहे , भारताने आज अंतराळात एका लाइव्ह सॅटेलाइल उदध्वस्त केला, अशी क्षमता प्राप्त करणारा भारत हा अमेरिका, रशिया आणि चीननंतरचा चौथा देश बनला आहे.
  • अंतराळ क्षेत्रात भारताने आज आपला झेंडा रोवला आहे. रशिया, अमेरिका आणि चीनने या पूर्वी अशा स्वरुपाची कामगिरी केली होती. मी भारतीय शास्त्रज्ञांचे आभार मानतो.

[su_youtube_advanced url=”https://youtu.be/gw4L5OP2Nz4″ width=”360″ height=”300″ autoplay=”yes” modestbranding=”yes” theme=”light” https=”yes” playsinline=”yes”]

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.