बीड जिल्हाब्रेकिंग न्युजमहाराष्ट्र राज्यलेखविज्ञानविशेष बातमीहेल्थ

करोना रोगावर अद्यापही उपचार नाही , झुंडीने बाहेरपडून रोग आपल्या दारात आनु नका ; करोनाला स्वतःपासून दूर ठेवण्यासाठी ह्यागोष्ठी पाळा

बीड: आठवडा विशेष टीम― जगात थैमान मांडलेल्या करोना विषानुवर आजपर्यंत कसल्याही प्रकारचा उपचार निघाला नाही केवळ सिमटोमॅटीक उपचार केला जात आहे.त्यामुळे कृपया कोणीही घराबाहेर पडून आजाराचे प्रसारमाध्यम बनू नये. डब्लूएचओ च्या नुसार हा आजार एअरबर्णी(Airborne) आहे.त्यामुळे चांगल्या दर्जाचे मास्क घालूनच अतिमहत्त्वाचे काम असेल तरच घराबाहेर पडावे.संपूर्ण महाराष्ट्रात १४४ कलम लागू करण्यात आला आहे. त्यामागचा हेतू एवढाच आहे की, करोना रोगाचा होत असलेला प्रसार तात्काळ रोखावा म्हणून सरकार सतर्कतेची भूमिका बजावत आहे.

ह्या आजारापासून दूर राहायचे असल्यास खालील गोष्टी करा…

  1. प्रत्येक १५ मिनिटाने अल्कोहॉलीक सॅनिटायझरने/ साबणाने हात धूत रहा.
  2. घरात असाल तर किमान दोनदा गरम पाण्याने अंघोळ करा.
  3. खोकला असणाऱ्या व्यक्तीपासून काही अंतरावर बसा किंवा त्या व्यक्तीस मास्क वापरण्यास सांगा व स्वतः देखील मास्क वापरा.
  4. आजूबाजूच्या लोखंडी,प्लास्टिक गोष्टीना विनाकारण हात लावू नका.तसेच दरवाजा उघडल्यानंतर किंवा बंद केल्यानंतर स्वतःच्या जवळअसलेल्या सॅनिटायझरने हात धुवून घ्या

अश्या काही गोष्टीवर जर तुम्ही पाळल्या तर करोनापासून स्वतःचा बचाव करू शकता.

Back to top button