कडा:शेख सिराज―
आष्टी तालुक्यातील दौलावडगाव येथील मराठवाडा साथी चे पत्रकार शेख कासम व कृषी भूषण बाबासाहेब पिसोरे हे दोघेनां २०२१ कोविड योद्धा पुरस्कार मिळाला अधिक माहिती अशी की,सध्या कोरोनाने जगभरात थैमान घातले असून त्यातून आपले आष्टी तालुका देखील सुटलेले नाही.गेल्या वर्षी शहरी भागात रुग्ण निघत होते.परंतु ह्या वेळी त्याचे लोन ग्रामीण भागात देखील पहावयास मिळत आहे.कित्येक लोकं अशी आहेत की ते शेजारी कोरोना रुग्ण निघाला तर बोलत सुद्धा नाहीत.अशा संकट समयी आपले समाजाला काही तरी देणं लागतं ह्या नियतीने शक्य होईल तितके कोरोना विरुद्ध लढत आहेत सामाजिक बांधीलकीची जाण ठेऊन कार्य करीत आहेत.याचीच दखल घेऊन अखिल महाराष्ट्र पत्रकार आणि पत्रलेखक संघ विश्वात्मक मराठी साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने दि ९ मे रोजी सांय. ६ वाजता राज्यस्तरीय कोविड योद्धा समाज रक्षक महासन्मान २०२१ हा पुरस्कार कृषिभूषण बाबासाहेब नानाभाऊ पिसोरे यांना ऑनलाइन मानपत्र देऊन गौरविण्यात आला आहे.तर १२ मे रोजी सांय ६ वाजता पञकार कासम शेख यांचा सन्मान होणार आहे.ह्या वेळी मार्गदर्शक म्हणून पद्मश्री डॉ.विजयकुमार शहा हे उपस्थित राहणार आहेत.ह्या कार्यक्रमाची संकल्पना कृष्णाजी जगदाळे यांची असून पुरस्कार प्राप्त शेख व पिसोरे यांच्यावर मित्र परिवाराकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.