समाजासमोरील मुलभूत समस्या संपल्याशिवाय विकास अशक्य-संदीप बर्वे
यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात राष्ट्रीय चर्चासत्र
अंबाजोगाई (प्रतिनिधी): पाण्याचे दुर्भिक्ष्य यामुळे ग्रामिण भागात महिलांची फरफट होते पाणी फाऊंडेशन सारख्या संस्थांमुळे गेल्या काही वर्षात जनजागृती होत आहे.तरी परंतु पाणी, आरोग्य आणि स्वच्छता या विषयीची जाणीव बालवयापासुन निर्माण होणे गरजेचे आहे. शासकीय योजना ग्रामिण भागापर्यंत पोहोंचवताना अनेक अडचणी येतात. त्यामुळे त्या हव्या तशा जनतेपर्यंत वेगाने पोहोंचत नाहीत. परिणामी योजनांचा लाभ जनतेला मिळत नाही असे प्रतिपादन सौ.मंगलाताई प्रकाशराव सोळंके यांनी केले.तर यावेळी बोलताना संदीप बर्वे यांनी स्त्री ही गुलाम आहे असे मनुस्मृतीने वेळोवेळी सांगितले आहे.महिलेला स्वातंत्र्य मिळू नये अशी व्यवस्था निर्माण करण्यात आली. त्यामुळे भारतीय समाजाने महिलेला दुय्यमत्व दिले असल्याचे सांगुन ज्या देशाने स्त्रीयांना समान हक्क दिले ते देश आजप्रगती करीत आहेत.जोपर्यंत महिला परिवर्तनाच्या चळवळींचे नेतृत्व करीत नाहीत तोपर्यंत अमुलाग्र बदल होणार नाही असे प्रतिपादन बर्वे यांनी केले.यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात आयोजित राष्ट्रीय चर्चासत्रात दोन्ही मान्यवर बोलत होते.
येथील मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात “स्त्रियांसमोरील पाणी, आरोग्य आणि स्वच्छता विषयक आव्हाने व शासकीय योजना” या विषयावर राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन मंगळवार,दि. 26 मार्च रोजी करण्यात आले होते.चर्चासत्राचे उद्घाटन सौ.मंगलाताई प्रकाशराव सोळंके यांच्या हस्ते करण्यात आले.या चर्चासत्रात 200 पेक्षा अधिक महिलांनी तसेच सदरील विषयाचे अभ्यासक, संशोधक व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी सहभाग नोंदवला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.अशोक मोहेकर हे होते.यावेळी प्रास्ताविक करताना “पाणी,आरोग्य आणि स्वच्छता” या संबंधी समाज व इतर घटकांमध्ये जागृती झाली पाहिजे असा या चर्चासत्राचा विधायक उद्देश असल्याचे प्राचार्या डॉ. वनमाला रेड्डी यांनी सांगितले व भूमिका विषद केली.या चर्चासत्रात सामाजिक कार्यकर्त्या मनिषाताई तोकले (बीड),संदीप बर्वे(पुणे),डॉ.शुभदाताई लोहिया (अंबाजोगाई), अॅड.शोभाताई लोमटे, प्राचार्य डॉ.सविताताई शेटे,प्राचार्य डॉ.अण्णासाहेब जाधव,अभियंता बडे,
सामाजिक कार्यकर्ते अनिकेत लोहिया आदी मान्यवरांनी सहभाग नोंदवला.
प्रारंभी लोकनेते यशवंतराव चव्हाण व क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करून अभिवादन करण्यात आले.संतोष शिंदे या विद्यार्थ्याने स्वागतगीत सादर केले. या प्रसंगी महाविद्यालय विकास समितीच्या सदस्य श्रीमती प्रतिभा देशमुख, उपप्राचार्य प्रा.कांतराव गाडे,उपप्राचार्य प्रा.भगवान शिंद चर्चासत्र संयोजक डॉ.अहिल्या बरूरे यांची प्रमुख उपस्थिती होती. उद्घाटन सत्राचे सुत्रसंचालन प्रा.शैलेश जाधव यांनी करून उपस्थितांचे आभार चर्चासत्र संयोजिका डॉ.अहिल्या बरूरे यांनी मानले.चर्चासत्राच्या यशस्वीतेसाठी डॉ.डी.बी.तांदुळजेकर, डॉ.मुकुंद राजपंखे, डॉ.दिलीप भिसे, डॉ.अरविंद घोडके, प्रा.इंद्रजीत भगत, प्रा.केशव हंडीबाग, प्रा.पी.के.जाधव, प्रा.सुजाता पाटील, प्रा.रोहिणी खंदारे, प्रा.मनोरमा पवार, प्रा.हिरा नाडे, प्रा.चव्हाण मॅडम, प्रा.देशपांडे मॅडम, प्रा.सोळंके मॅडम, अधिक्षक लक्ष्मण वाघमारे यांच्यासह महाविद्यालयातील संशोधक विद्यार्थी, प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचारी यांनी सहकार्य केले.