बातम्या
FMGE Hunger Strike: MPs Back FMGE Marks Compensation as Hunger Strike Hits Critical Day 7 FMGE June 2026 Crisis: Indefinite Fast Enters Day 5; Protesting Doctors Issue 5:00 PM Final Ultimatum to NBEMS, Announce Nationwide District-Level Hunger Strikes प्रशासनाचा भोंगळ कारभार: FMGE June 2026 च्या ३८,००० डॉक्टरांचे दिल्लीत बेमुदत उपोषण! शेतकऱ्यांनो लक्ष द्या! महाडीबीटीवरील कुंपण अनुदान सर्वांसाठी नाही; पाहा नेमकी पात्रता काय? फडणवीस सरकार मुर्दाबादच्या घोषणांनी पाटोदा दणाणला; शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या जी.आर.ची होळी बीड जिल्ह्यात डिझेलची तीव्र टंचाई; महाजनवाडी पेट्रोल पंपावर नागरिकांची अलोट गर्दी ३०० कोटी वृक्षलागवड: ‘रेकॉर्डब्रेक’ बीड प्रशासनाला हरित आयोगावर संधी द्या; डॉ. गणेश ढवळे यांची राज्य सरकारकडे मागणी अखेर ५ कोटी खर्चून उभारलेल्या च-हाटा प्राथमिक आरोग्य केंद्राला वीजजोडणी; ९ वर्षांचा ‘अंधारातून उजेडाकडे’ प्रवास पूर्ण, जलसमाधी आंदोलनाचे यश : डॉ. गणेश ढवळे डॉ. लक्ष्मण जाधव यांची लोकशाही पत्रकार संघाच्या आरोग्य विकास समितीच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड बीड बसस्थानक गळती प्रकरण: काझी संघाणी ग्रुपला एसटी महामंडळाची नोटीस, राजकीय वरदहस्तामुळे गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ? FMGE Hunger Strike: MPs Back FMGE Marks Compensation as Hunger Strike Hits Critical Day 7 FMGE June 2026 Crisis: Indefinite Fast Enters Day 5; Protesting Doctors Issue 5:00 PM Final Ultimatum to NBEMS, Announce Nationwide District-Level Hunger Strikes प्रशासनाचा भोंगळ कारभार: FMGE June 2026 च्या ३८,००० डॉक्टरांचे दिल्लीत बेमुदत उपोषण! शेतकऱ्यांनो लक्ष द्या! महाडीबीटीवरील कुंपण अनुदान सर्वांसाठी नाही; पाहा नेमकी पात्रता काय? फडणवीस सरकार मुर्दाबादच्या घोषणांनी पाटोदा दणाणला; शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या जी.आर.ची होळी बीड जिल्ह्यात डिझेलची तीव्र टंचाई; महाजनवाडी पेट्रोल पंपावर नागरिकांची अलोट गर्दी ३०० कोटी वृक्षलागवड: ‘रेकॉर्डब्रेक’ बीड प्रशासनाला हरित आयोगावर संधी द्या; डॉ. गणेश ढवळे यांची राज्य सरकारकडे मागणी अखेर ५ कोटी खर्चून उभारलेल्या च-हाटा प्राथमिक आरोग्य केंद्राला वीजजोडणी; ९ वर्षांचा ‘अंधारातून उजेडाकडे’ प्रवास पूर्ण, जलसमाधी आंदोलनाचे यश : डॉ. गणेश ढवळे डॉ. लक्ष्मण जाधव यांची लोकशाही पत्रकार संघाच्या आरोग्य विकास समितीच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड बीड बसस्थानक गळती प्रकरण: काझी संघाणी ग्रुपला एसटी महामंडळाची नोटीस, राजकीय वरदहस्तामुळे गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ?

ग्रामीण भागातील जनतेच्या आरोग्याची काळजी घेणार- राजेसाहेब देशमुख ;आपेगाव येथील कोविड केअर सेंटरचे मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण

अंबाजोगाई (वार्ताहर):
तालुक्यातील आपेगाव येथे शुक्रवार,दिनांक १४ मे रोजी जिल्हा परिषद आरोग्य विभाग,बीड.,इंटरनॅशनल डेव्हलपमेंट इंडियन असोसिएशन (इंडीया) संस्था,अंबाजोगाई यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच मानवलोक संस्था,अंबाजोगाई.,ग्रामपंचायत आपेगाव आणि श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्था यांच्या मदतीने श्री जयकिसान महाविद्यालय,आपेगाव या ठिकाणी जि.प.सदस्य राजेसाहेब देशमुख यांच्या पुढाकार व संकल्पनेतून उभारण्यात आलेल्या ५० खाटांच्या कोविड केअर सेंटरचे आमदार संजयभाऊ दौंड यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.सौम्य लक्षणे असलेल्या रूग्णांवर येथे उद्यापासून मोफत उपचार सुरू करण्यात येणार आहेत.याप्रसंगी उद्घाटक म्हणून बोलताना आ.संजयभाऊ दौंड म्हणाले की,जि.प.सदस्य राजेसाहेब देशमुख हे एक संवेदनशील लोकप्रतिनिधी म्हणून कोरोना महामारीचा मुकाबला करण्यासाठी स्वतः ला झोकून देत काम करीत आहेत.देशमुख यांच्या संकल्पनेतून तसेच जिल्हा परिषद आरोग्य विभाग,बीड.,इंटरनॅशनल डेव्हलपमेंट इंडियन असोसिएशन (इंडीया) संस्था,अंबाजोगाई यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच मानवलोक संस्था,अंबाजोगाई.,ग्रामपंचायत आपेगाव आणि श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्था यांच्या मदतीने साकार झालेले आपेगाव येथील सर्व सुविधांनी युक्त कोविड केअर सेंटर म्हणजे माणुसकीचे उत्तम उदाहरण असून सर्वांनी त्याचा आदर्श घ्यावा असे मत आ.संजयभाऊ दौंड यांनी यावेळी व्यक्त केले.प्रारंभी बोलताना राजेसाहेब देशमुख म्हणाले की,अंबाजोगाई तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोना बाधित रूग्णांची दररोज वाढत असलेली संख्या लक्षात घेऊन गरजू रूग्णांना खाटा उपलब्ध व्हाव्यात तसेच त्यांची उपचारासाठी होणारी परवड थांबावी या उद्देशाने या भागातील लोकप्रतिनिधी व इंटरनॅशनल डेव्हलपमेंट इंडियन असोसिएशन (इंडीया) संस्था,अंबाजोगाई या संस्थेचा अध्यक्ष म्हणून मी तसेच बीड जिल्हा परीषदेचा आरोग्य विभाग,मानवलोकचे कार्यवाह अनिकेत लोहिया,आपेगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ.प्रियंकाताई निलेशराव शिंदे आणि श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव जयजीत बापू शिंदे आम्ही सर्वांनी पुढाकार घेऊन आपेगाव येथील श्री जयकिसान महाविद्यालयात उभारलेल्या पहिल्या टप्प्यातील ५० खाटा असलेल्या कोविड सेंटरचे उद्घाटन आज होत असल्याचे देशमुख म्हणाले.यावेळी उपस्थित सर्वच मान्यवरांनी आपेगाव येथील कोविड केअर सेंटर मधील उपलब्ध सुविधांची पाहणी करून माहिती घेतली तसेच येथे आवश्यक असलेल्या डॉक्टर्स व अन्य स्टाफ उपलब्ध करून,रूग्णांना भोजन,नाष्टा आदी व्यवस्थापन करण्याबाबतचे नियोजन पाहून अनेकांनी समाधान व्यक्त केले.प्रारंभी श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे संस्थापक कै.कर्मवीर शेषेराव आप्पा शिंदे यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.त्यानंतर आ.संजयभाऊ दौंड व शिवाजीराव सिरसाट यांनी फीत कापून लोकार्पण केले.दीपप्रज्ज्वलन करून छञपती संभाजी महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.याप्रसंगी विधान परिषदेचे आमदार संजयभाऊ दौंड,माजी आ.पृथ्विराज साठे,सामाजिक कार्यकर्ते शिवाजीराव सिरसाट,जि.प.सदस्य राजेसाहेब देशमुख,डॉ.नरेंद्र काळे,सहकारातील नेते विलासराव सोनवणे,अनिकेत लोहिया,गोविंदराव देशमुख,राहुल सोनवणे,हाणमंतराव मोरे,ॲड.माधव जाधव,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.पवार,ह.भ.प.लालासाहेब नाना पवार,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.बालासाहेब लोमटे,
आबासाहेब पांडे,सामाजिक कार्यकर्ते निलेशराव शिंदे,जयजीतबापू शिंदे,पञकार संतोष सोनवणे,आश्रुबा करडे,केशवनाना ढगे,शंभूराजे देशमुख,ईश्वर शिंदे,अशोक देशमुख,शरद शिंदे,गणेश गंगणे आदी मान्यवर उपस्थित होते.येथे दाखल रूग्णांना आरोग्य विषयक सुविधांसह भोजनही मोफत देण्यात येणार आहे.यावेळी राजेसाहेब देशमुख,सरपंच सौ.प्रियंकाताई निलेशराव शिंदे व जयजीतबापू शिंदे यांनी कोविड पार्श्वभूमीवर या कठीण काळात समर्पित भावनेने उभारलेल्या या कोविड केअर सेंटरला अत्यंत कमी वेळेत सुरू केल्याबद्दल उपस्थित अनेकांनी समाधान व्यक्त करून जिल्हा परिषद आरोग्य विभाग,बीड.,इंटरनॅशनल डेव्हलपमेंट इंडियन असोसिएशन (इंडीया) संस्था,अंबाजोगाई यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच मानवलोक संस्था,अंबाजोगाई.,ग्रामपंचायत आपेगाव आणि श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्था यांच्या मदतीने साकार झालेले आपेगाव येथील सर्वसुविधांनी युक्त कोविड केअर सेंटरचे कौतुक केले.हसत खेळत आनंदी वातावरणात कोरोना बाधितांवर उपचार
==================
याबाबत अधिक माहिती देताना संकल्पनेचे जनक राजेसाहेब देशमुख म्हणाले की,अंबाजोगाई तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोना बाधित रूग्णांची दररोज वाढत असलेली संख्या लक्षात घेऊन गरजू रूग्णांना खाटा उपलब्ध व्हाव्यात तसेच त्यांची उपचारासाठी होणारी परवड थांबावी या उद्देशाने या ठिकाणी स्ञी व पुरूष रूग्णांसाठी उपचाराची स्वतंत्र व्यवस्था,मेडिकल स्टाफ,आवश्यक औषधे,सुविधा उपलब्ध आहेत.येथील रूग्णांच्या सेवेसाठी निष्णात डॉक्टरांचा फौजफाटा नेमण्यात आला आहे.त्यासोबत मोठ्या प्रमाणात कर्मचारी व स्वयंसेवक असणार आहेत.हसत खेळत आनंदी वातावरणात बाधितांवर उपचार करण्यात येतील,सकाळी प्राणायाम व योगासने आणि राञी संगीताची सुरेल मेजवानी मिळणार आहे.सोबतच कवि संमेलन आणि गीत गायन केले जाईल.योग्य निदान,तात्काळ औषधोपचार,पौष्टिक आहार देवून सेवा सुविधा पुरविण्यात येतील.या परीसरात प्रवेश करताच रूग्ण व्याधी विसरून जाईल.आपेगाव येथील कोविड केअर सेंटर हे बीड जिल्ह्यातील एक उत्कृष्ट कोविड केअर सेंटर करण्यासाठी कटिबद्ध आहोत असे जि.प.सदस्य राजेसाहेब देशमुख यांनी सांगितले.