बजरंग सोनवणेंच्या प्रचाराला वेग; विरोधीपक्षनेता वाड्या-वस्त्यांवर!

अंबाजोगाई (प्रतिनिधी) दि.२७ : बीड लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज भरताना रॅली आणि सभेवरून वातावरण चांगलेच गरम झाले. भर चौकात गाडीच्या टपावर उभे राहून धनंजय मुंडेंनी केलेले तडाखेबंद भाषण जिल्ह्यासह सबंध महाराष्ट्राने पाहिले. नामांकने भरून झाल्यानंतर आता ‘दबंग’ विरुद्ध ‘बजरंग’ असा सामना रंगताना दिसतो आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस – काँग्रेस व मित्र पक्ष आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या प्रचाराची मुख्य धुरा विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे यांनी जबाबदारीने सांभाळली असून ते जातीने सगळा जिल्हा पिंजून काढत आहेत.

बीड लोकसभेची लढाई ही धनशक्ती विरूध्द सामान्य शेतकर्‍याच्या मुलाची अशी असून, बजरंगबप्पा यांच्या रूपाने शेतकर्‍याच्या पोराला तुमचे प्रश्‍न मांडण्यासाठी, ते सोडवण्यासाठी लोकसभेत पाठवा असे आवाहन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केले आहे.

धनंजय मुंडे यांनी आज अंबाजोगाई येथून मतदारांच्या प्रत्यक्ष गाठीभेठी घेत प्रचार दौर्‍यास सुरूवात केली. जनतेला अनेक स्वप्ने दाखवणार्‍या सरकारने एकही स्वप्न पुर्ण केले नाही, संविधान जाळण्याचे काम मात्र केले. जनतेची पावला पावलावर फसवणुक केली, कर्जमाफी विरोधकांच्या रेट्यामुळे झाली, मात्र ती ही फसवी आहे, आणि 6 हजार खात्यावर येणार हे ही फसवे आहे. मराठा, धनगर, मुस्लिम आरक्षणाबाबतही फसवणुक केली असून, सबका साथ सबका विकास म्हणणार्‍या सरकारने कुणाचा विकास केला? असा प्रश्‍न उपस्थित केला.

ग्रामपंचायत सदस्य ते लोकसभेचा उमेदवार असा स्वकर्तृत्वाने प्रवास करणार्‍या बजरंगबप्पा यांच्या कारखान्याने ऊसाला योग्य भाव दिला, वारसा हक्काने मिळालेल्या इथल्या प्रतिनिधीला मात्र कारखानाही सांभाळता आला नाही, म्हणुनच आता काम करणार्‍या माणसाला लोकसभेत पाठवा असे आवाहन त्यांनी केले.

अंबाजोगाई तालुक्याच्या प्रचार दौऱ्यात यावेळी त्यांच्या समवेत उमेदवारासह, परळी विधान सभेचे अध्यक्ष गोविंद देशमुख, ज्येष्ठ नेते दत्ता आबा पाटील, माजी जि.प. सदस्य राजपाल लोमटे, अंबाजोगाई तालुकाध्यक्ष रणजित चाचा लोमटे, उपसभापती तानाजी देशमुख, युवक तालुकाध्यक्ष गणेश देशमुख, प्रशांत जगताप, बाळासाहेब सोनवणे, दिपक सांगळे, संभाजी लोमटे, अख्तर जहागीरदार, अमोल किर्दंत, शेख हाजी, सलाम पठाण, अनुरथ किर्दंत, वाहेद भाई, पठाण महेमुद, असद जहागीरदार, अमोल किर्दंत, रमेश किर्दंत, विराज जगदाळे, बंडु कांबळे, मेहराज शेख यांसह असंख्य कार्यकर्ते-पदाधिकारी उपस्थित होते.

विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे हे स्वतः वाडी-वस्त्यांवर गावा गावात पोचून मतदाऱ्यांच्या भेटीगाठी घेत प्रचारात सहभागी होत असल्याने आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांची लोकप्रियता वाढत आहे.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.