सोयगाव दि.२७(ज्ञानेश्वर धोंडू पाटील):पोषण अभियानाअंतर्गत महिला बाल विकास प्रकल्प सोयगावचं वतीने बुधवारी शहरातून तालुका स्तरीय पोषण रॅली काढण्यात आली यावेळी तालुक्यातील अंगणवाडी सेविका,मदतनीस आणि बचत गटांच्या महिलांचा मोठा समावेश होता.पंचायत समितीच्या मैदानावरून प्रारंभ झालेल्या या रॅलीचा प्रकल्प कार्यालयाजवळ समारोप करण्यात आला.
पोषण रॅलीद्वारे महिला विधायक कायदे,पोषण आरोग्य व शिक्षण विषयक जनजागृती करण्यात आली,प्रभारी प्रकल्प अधिकारी रुक्मिणी पारधे,पर्यवेक्षक वैशाली पाटील यांच्या नेतृत्वाखाली या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते,दरम्यान पोषण अभियान जनआंदोलन अभियाना अंतर्गत प्रकल्प विभागाकडून तालुकाभर भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याचे लार्य्वेक्षक वैशाली पाटील यांनी सांगितले.या दरम्यान जरंडी ता.सोयगाव येथील प्राथमिक शाळेत किशोरवयीन मुलींसाठी निबंध स्पर्धा व रांगोळी स्पर्धा घेण्यात आल्या,यामध्ये पाचवी ते सातवी या इयत्तांसाठी बेटी बचाव,बेटी पढाओ या विषयावर निबंध स्पर्धा घेण्यात आल्या यामध्ये अनुक्रमे भाग्यश्री गांगुर्डे,राजश्री गायकवाड,सानिका चव्हाण यांना पारितोषिक देण्यात आले.वैशाली पाटील,रुक्मिणी पारधे,सुरेखा ठाकरे आदींनी पुढाकार घेतला.