विरोधकांचा रडीचा डाव फसला
बीड(प्रतिनिधी): बीड लोकसभा मतदार संघात भारतीय जनता पार्टी-शिवसेना-रिपाई-रासप या महायुतीच्या अधिकृत उमेदवार विद्यामान खा.डॉ.प्रितमताई गोपीनाथ मुंडे यांनी मोठे शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. आज बुधवार रोजी निवडणुक आयोगाच्या वतीने अर्जाची छाननी झाली. मात्र अपक्ष उमेदवार कालिदास अपेट यांचा वापर करत राष्ट्रवादीच्या चांडळ चौकटीने डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप दाखल केला. सायंकाळी 5.00 वा. विरोधाकांचा रडीचा डाव पुन्हा एकदा फसला असून त्यांच्या अर्जावर घेण्यात आलेला आक्षेप निवडणुक अयोगाने फेटाळून लावला आहे. आक्षेप अर्ज फेटळताच बीड शहरात भाजपा कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष साजरा केला.
बीड लोकसभा मतदार संघ भारतीय जनता पार्टी-शिवसेना-रिपाई-रासप या महायुतीच्या उमेदवार खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर आज जिल्हाधिकारी कार्यालयात सर्वच दाखल उमेदवारांचे अर्ज छाननी झाली. अपक्ष उमेदवार कालिदास अपेट यांनी सुरुवातीलाच खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप नोंदवत त्यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्यात यावा अशी मागणी केली. या संदर्भात दु 4 वा सुनावणी ठेवण्यात आली होती दरम्यानच्या काळात खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेण्यात आल्याचे समजताच जिल्हाभरातून कार्यकर्ते पदाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात जमा झाले होते. त्यामुळे परिसरात चांगलेच वातावरण तापले होते. दुपारी 4 वा या अक्षेप अर्जावर सुनावणी पुर्ण करण्यात आली व अपक्ष उमेदवार कालिदास अपेट यांनी घेतलेले आक्षेप फेटाळून लावण्यात आले. अक्षेप फेटाळून लावण्यात आल्याचे समजताच बाहेर उभे असलेल्या कार्यकर्त्यानी एकच जल्लोष करत संडे टू मंडे गोपीनाथ मुंडे, मुंडे साहेबांचा बालेकिल्ला बीड जिल्हा बीड जिल्हा, येऊन येऊन येणार कोन प्रितमताईशिवाय आहेच कोण अशा घोषणांनी बीड शहर दणाणून सोडलीे. जिल्हाधिकारी कार्यालय येथे भाजपा जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे यांच्या अटल जनसेवक कार्यालयापर्यत कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी घोषणाबाजी करत पदयात्रा काढली. या ठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी करून विरोधकांच्या रडीच्या डावाचा निषेध यावेळी नोंदवण्यात आला. आष्टी मतदार संघाचे आ.भिमराव धोंडे यांनी या वेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना सांगितले की, विरोकांनी केलेले आरोप हे तथ्यहिन आहेत ते सर्वांनाच माहित आहे. आज झालेला प्रकार चुकीचा असून महायुतीच्या कार्यकर्त्यांनी याचा बदला हा मतपेटीतून घ्यावा व विरोधकांना त्यांची जागा दाखवून द्यावी.
या वेळी बोलतांना जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे म्हणाले की, अपक्ष उमेदवार कालिदास अपेट यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी कॉंगे्रस रडीचा डाव खेळत आहे. त्यांचा पराभव होणार हे निश्चीत असल्यामुळेच ते असे रडीचे डाव खेळत आहेत. पण त्यांचा डाव पुन्हा एकदा फसला असून येणार्या काळात त्यांची कोतीही कुटिल योजना आम्ही सफल होवू देणार नाही हे त्यांनी लक्षात घ्यावे तर शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे म्हणाले की, असे चुटपुट डाव खेळून खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न कधीच पुर्ण होवू शकत नाही. जिल्हयातील शिवसैनिक तन,मन,धनाने मुंडे भगिंनीच्या सोबत असून विरोधकांनी शिवसैनिकांचा अंत पाहू नये असा इशारा त्यांनी दिला. या वेळी विजय गोल्हार, संतोष हंगे, राजाभाऊ मुंडे, जगदिश गुरखुदे, गोरख रसाळ, विक्रांत हजारी, सलिम जहांगिर, इंजि.एम एन बडे, उपसरपंच संजय शिरसाट, सावळेराम जायभाये, भागवत वारे, मा. सभापति बाबुराव केदार ऍड.संगिता धसे, शितल राजपुत, शैलाताई मुसळे, लताताई मस्के, यांच्यासह कार्यकर्ते पदाधिकारी मोठया प्रमाणावर उपस्थित होते.