पाटोदा (शेख महेशर) दि.२८: शासनाने दुष्काळ जाहिर करुन पाच महिने झाले आज शेळया, मेंढयांना गावाच्या कोणत्या ही शिवारात चारा उपलब्ध राहिलेला नाही तरी पण शासनाने दुष्काळामध्ये शेळ्या, मेंढयांना त्यांच्या हक्कापासून वंचित का ठेवले त्यांच्या पालनकर्त्यांच्या नावे छावणीवरील लहान जनावरांच्या खर्चाचा मोबदला प्रती शेळी, मेंढी ४५ रुपये देण्यात यावा अशी मागणी भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे मध्यवती समितीची सदस्य भाई विष्णुपंत घोलप यांनी लेखी निवेदनाव्दारे उपविभागीय अधिकारी कार्यालय पाटोदा यांच्या मार्फत शासनाला कळविले आहे. मागील खरीप पिक पावसा अभावी पदरात पडले नाही रब्बीची पेरणी काही ठिकाणीच झाली आणि जेथे झाली तेथे पेरलेले उगवले नाही, जेथे उगवले ते थोड्याच दिवसात करपुन गेले. त्या मुळे जनावारासकट शेळ्या, मेंढयाठी गेल्या सहा महिण्यापासुन चाऱ्याची टंचाई आहे. दिवस भर किती ही शिवारात शेळ्या, मेंढया फिरल्या तरी त्यांचे पोट भरत नाही. आणि त्यांना वेळे वर पाणी देखील मिळत नाही, त्या करीता शासनाने जनावाराच्या छावणी मधील जो एक लहान जनावारासाठी खर्च येतो म्हणजे किमान ४५ रुपये शेळी व मेंढी पालन करणाऱ्यांच्या नावे अनुदान द्यावे. जेणे करुन शेळी व मेंढी सांभाळणारा शेतकरी, शेत मजुर किंवा इतर पालन करणारा त्या पैशातुन मका, तुर, हरभऱ्याची चुर, गोळी पेंढ किंवा खपरी पेंढ, विकत घेऊन शेळ्या, मेंढयाना जतन करील आपल्या भागात काही शेळी फार्मवाल्यानी पश्चिम महाराष्ट्रातुन मुरघास विकत आणला आहे. शेळी व मेंढी पालनामुळे बऱ्याचशा लोकांना आर्थिक स्थैर्य लाभले आहे. किमान गरजा भागविण्यासाठी त्याला कोणत्या ही वेळेस शेळी किंवा मेंढी तो विक्री करुन आपली आर्थिक गरज सोडवू शकतो शेळया मेंढया पालन करणारा वर्ग आत्महत्या कडे वळत नाही परंतु त्याची आजची परिस्थीती दुष्काळा मुळे खुपच भयानक झालेली आहे. शेळया व मेंढया बाजारात विक्री साठी नेहल्यातर एकदम अल्प किमतीमध्ये विकाव्या लागत आहेत. त्या मुळे त्याचे आर्थिक नुकसान होत आहे. त्या साठी शासनाने वरील विषयी गांभीयपूर्वक विचार करुन शेळी व मेंढी पालनकर्त्यांना असल्या भयानक दुष्काळा मध्ये आर्थिक मदत तात्काळ द्यावी. अशी लेखी निवेदनाव्दारे शासनाकडे मागणी भाई विष्णुपंत घोलप यांनी केली आहे. याची माहिती त्यांनी मा.ना.पंकजाताई मुंडे. ग्रामविकास मंत्री तथा महिला व बालविकास तथा पालकमंत्री बीड जिल्हा), मा.ना.महादेवजी जानकर,(पशु संवर्धन आणि दुग्ध विकास मंत्री महाराष्ट्र राज्य), मा.आ.धनजंयजी मुंडे( विरोधी पक्ष नेते विधान परिषद मुंबई), मा.आ.भाई जयंत पाटील, (सरचिटणीस भारतीय शेतकरी कामगार पक्ष) यांना दिली आहे.