पाटोदा तालुका

कमळाला मत म्हणजे सर्वांगीण विकासाला मत―बाबासाहेब गर्जे

पाटोदा (शेख महेशर): आगामी काळात होऊ घातलेल्या लोकसभेच्या निवडणूकात पुन्हा एकदा देशात भारतीय जनता पक्ष युतीचे सरकार स्थापीत करण्या साठी सर्वांनी कमळाला मतदान करावे, कारण कमळाला मत म्हणजे देशाच्या सर्वांगीण विकासाला मत, तेव्हा राज्यातील देशातील तमाम राष्ट्रप्रेमी मतदारांनी भविष्यातील भारताच्या मजबुती साठी केंद्रात भारतीय जनता पक्षाला प्रचंड मताने निवडून द्यावे.असे आवाहन पाटोदा येथील भारतीय जनता पक्षाचे जेष्ठ कार्यकर्ते बाबासाहेब गर्जे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकातून केले आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरील देशाच्या सार्वभौमत्वासाठी त्यांनी केलेले प्रयत्न न भूतो न भविष्यती असे आहेत. शेतकरी, बेरोजगार, कुशल युवक, कारखानदारी, देशांतर्गत चालु असलेले रस्त्याची कामे, राबविण्यात आलेल्या वेगवेगळया योजना, जागतिक पातळीवर भारताचा वाढलेला दबदबा पाहता,नरेंद्र मोदी आणि केंद्रातील त्याचे सहकारी हे आज जनतेच्या गळ्यातील ताईत झालेले आहेत. तेव्हा देशाच्या सर्वांगीण विकासाचा आणि राष्ट्र, देश मजबुतीचा विचार करता येत्या लोकसभा निवडणूकीत भारतीय जनता पक्ष, मित्र पक्षाच्या उमेदवारांना प्रचंड मतांनी निवडून द्यावे. आणि आपल्या स्वप्नातील सुजलाम् सुफलाम् भारत साकार करावा. असे आवाहन भा.ज.पा. चे जेष्ठ कार्यकर्ते बाबासाहेब गर्जे यांनी प्रसिद्धी पत्रकातून केले आहे.

    WhatsApp वर बातम्या हव्यात ?


    बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

    This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.