अकोट तालुका ग्रामीण पत्रकार संघाची तहसीलदारांना निवेदनव्दारे केली मागणी
अकोला(प्रतिनिधी):बाभूळगाव चे पत्रकार प्रवीण दांडगे यांचे पत्नीसोबत शेजारी राहणा-या व्यक्तीने वाद घालून मारहाण केल्याची तक्रार पातुर पो स्टे ला देण्यात आली होती. त्यावेळी ३ तास प्रवीण दांडगे यांना, थांबून ठेवले या संदर्भात वृत पत्रातुन बातम्या प्रकाशित झाल्याने ठाणेदार गुल्हाने व जमादारास दांडगेच्या घरी जावून त्यांना ठाण्यात बोलावले व जातिवादक शिवीगाळ करून बातम्या प्रकाशित का केल्या. असा म्हणत मारहाण केली म्हणून ठाणेदार गुल्हाने यांच्या वर तात्काळ कार्यवाही करण्याची मागणी. अकोट तालुका पत्रकार संघाचे वतीने अकोट तहसीलदारांना निवेदन देऊन त्यांचा जाहिर निषेध करण्यात आला. या निवेदन देते वेळी अकोट तालुका अध्य्क्ष जगन्नाथ कोंडे जिल्हा उपाध्य्क्ष शेख अहेमद शेख बब्बू, गणेश वाकोडे, प्रकाश आम्ले, निरंजन गावंडे, स्वप्निल सरकटे ,संतोष विणके, गौरव बुधे, सै नूर सै उस्मान, कमलेश राठी ,गोवर्धन चव्हाण, यांच्यासह अकोट तालुका पत्रकार संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.