पाटोदा (शेख महेशर): पाटोदा येथील सामाजिक बांधिलकीतून सुरु करण्यात आलेल्या माणुसकीची भिंत या उपक्रमाला सामाजिक बांधीलकी म्हणून इयत्ता बारावी ची जुनी पुस्तके श्री. ज्ञानेश्वर डिडूळ यांनी भेट म्हणून दिली. या मध्ये मराठी, हिंदी, वाणिज्य व्यवस्थापन, ही पुस्तके आहेत, ती माणुसकीची भिंत या उपक्रमातून गरजू गरीब विद्यार्थ्यांना मोफत दिली जातील. गरीब गरजू विद्यार्थ्यांनी या साठी माणुसकीची भिंत या उपक्रमाचे संयोजक पञकार दत्ता देशमाने, विश्वजीत जनरल स्टोअर्स बस स्टँड समोर पाटोदा. यांच्याशी संपर्क साधावा मो. 0927252 2893 व ज्यांच्या कडे जुनी पुस्तके असतील त्यांनी माणुसकीची भिंत या उपक्रमास आमच्याकडे द्यावी, शालेय पुस्तके, स्पर्धा परीक्षेची पुस्तके, ती गरजू गरीब विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली जातील असे माणुसकीची भिंत चे मार्गदर्शक ह.भ.प.डॉ.रविंद्र गोरे, संयोजक पञकार दत्ता देशमाने यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केले.