अंबाजोगाई (प्रतिनिधी): आत्मप्रत्यय त्रैमासिकाचे संपादक प्रा.डॉ.दिलीप सावंत यांनी ‘पिंपळवृक्ष प्रा.गौतम गायकवाडः व्यक्ति आणि वाड्मय’ हा आत्मप्रत्यय त्रैमासिक विशेषांक प्रकाशित केला आहे.या ‘पिंपळवृक्ष’ ग्रंथात पंचेवीस अभ्यासकांनी प्रा.गौतम गायकवाड यांची जडण-घडण,साहित्य निर्मितीच्या प्रेरणा,मुखपृष्ठांचा अन्वयार्थ,वेदना आणि विद्रोह,विवेकशील विद्रोह,नकार स्वीकार,आत्मशोध आणि आत्मटिका आदी १३ ग्रंथांची ओळख तसेच परिशिष्टांतील सन्मानपत्र पुरस्कार कांही फोटोंचा समावेश केला आहे.या ग्रंथाचे प्रवर्तनवादी साहित्य वर्तुळातून स्वागत होत आहे.
प्रा.गौतम गायकवाड यांच्या वाड्मयाची निर्मिती अनुभवातून,वाचनातून झाली आहे.प्रतिभा ही अभ्यासाने निर्माण करता येते.वाचनाने साध्य करता येते.याची जाणीव ग्रंथ वाचल्याने होते.आपलेच माणसं प्रचंड वेळ,बुद्धी,पैसा खर्चूनही ती सुधारून उभारत नाहीत.प्रा.गौतम गायकवाड यांच्या ‘मनातले शल्य’ हे त्यांच्या अनेक साहित्यकृतीला जन्म देते.”पिंपळवृक्ष” ग्रंथात अभ्यासकांनी प्रा.गौतम गायकवाड हे बंडखोर,विद्रोही, परिवर्तनाचा नायक, साहित्यातील न शमणारे वादळ, बुद्ध-फुले-आंबेडकरी विचारांचे अभ्यासक, बुद्ध-फुले-आंबेडकरी विचारांचे वैचारिक अधिष्ठान असलेल्या व्यक्तिला “पिंपळवृक्ष” असे,मत व्यक्त केले आहे.माणसाला वाचनातून ज्ञानपणे येते,अनुभवातून शहाणपण येते. ज्ञानपण+शहाणपण= माणूसपण या सुत्रात बसणारे व्यक्तिमत्व प्रा.गौतम गायकवाड असून त्यांच्या अनेक ग्रंथांचे प्रकाशन यापूर्वी अॅड.प्रकाश आंबेडकर,डॉ.सुखदेव थोरात,आनंदराज आंबेडकर,ज.वि.पवार,प्रा.अविनाश डोळस, डॉ.प्रल्हाद लुलेकर, डॉ.महेश मोरे आदी मान्यवर,विचारवंत अभ्यासक यांच्या हस्ते झाले आहे. “पिंपळवृक्ष” ग्रंथात प्रा.गौतम गायकवाड यांच्या वाड्मयीन लेखणाची नोंद डॉ.दिलीप सावंत यांनी घेऊन न्याय दिला आहे. मराठवाड्याचे पुणे समजले जाणा-या शहरातील बुद्धिवंतांनी,साहित्यिकांनी त्यांना न्याय दिला नाही.कारण,ते फुले-आंबेडकरी विचारांचे वैचारिक अधिष्ठान असलेले लेखक आहेत.या “पिंपळवृक्ष” ग्रंथाचे मुखपृष्ठ प्रा.गौतम गायकवाड यांनी लिहिलेल्या अनेक पुस्तकांचे मुखपृष्ठ असून ते अत्यंत देखणे झाले आहे. बुद्ध-फुले-आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी, अभ्यासकांनी,
साहित्यिकांनी हा 208 पानांचा ग्रंथ आवर्जून वाचावा असा आहे. “पिंपळवृक्ष” ग्रंथाचे मुखपृष्ठ अत्यंत बोलके आहे.हा ग्रंथ वाचकांना सामाजिक ऋणांच्या उतराईतून मुक्त होण्यास प्रेरणा देणारा आहे.प्रा.डॉ.दिलीप सावंत,नांदेड यांनी परिश्रम घेऊन “पिंपळवृक्ष” ग्रंथ प्रकाशित केला आहे.यासाठी त्यांचे मनःपुर्वक अभिनंदन. वाचकांनी संग्रही ठेवावा असा हा “पिंपळवृक्ष” ग्रंथ आहे.ग्रंथाचे मुल्य- १५० रूपये आहे,तर पृष्ठ संख्या- २०८ एवढी आहे.ज्यांना ग्रंथ हवा आहे त्यांनी “पिंपळवृक्ष” ग्रंथाचे संपादक प्रा.डॉ.दिलीप सावंत (मोबा-९८६०५९९०६१),प्रा.गौतम गायकवाड (मोबा-८००७२७२४८३) यांचेशी संपर्क साधावा.