ब्रेकिंग न्युजराजकारणराष्ट्रीय

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना 'लावारिस' म्हणणाऱ्या प्रवृत्तींना राजकारणातुन हद्दपार करा - अजित नवले

मुंबई: "लायकी नसली ,क्षमता नसली ,बुद्धिमत्तेचा अंक कमी असला की काय होत याच अवधूत वाघ हे एक उत्तम नमुना आहेत.केवळ अवधूत वाघच नव्हे तर भाजपाचे नेते,प्रवक्ते हे अशाचप्रकारचे नमुने आहेत.या नामुन्यांचं येत्या निवडणूकिमध्ये काय करायचं,यांच्या पक्षाचं काय करायचं याचा विचार शेतकऱ्यांची पोरं नक्की करतील.आणि अशा प्रवृत्ती महाराष्ट्राच्या समाजकारणातून आणि राजकारणातुन हद्दपार करण्याच्याबद्दल नक्कीच निर्णय घेतील" अशी किसान सभेच्या वतीने अजित नवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

  WhatsApp वर बातम्या हव्यात ?


  दरम्यान,भाजपा प्रवक्ते अवधूत वाघ यांनी पुन्हा ट्विटरच्या माध्यमातून बेताल वक्तव्य केलं आहे. यावेळी अवधूत वाघ यांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या अनाथ मुलांना ‘लावारीस’ असे म्हटले आहे.आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांच्या मुलांची अत्यंत खालच्या स्थरावरील भाषेत बिजेपी प्रवक्ते अवधूत वाघ यांनी थट्टा केली आहे. त्यामुळे अवधूत वाघ यांच्यावर आता सोशल माध्यमासह सर्व स्तरातून टीका सुरु झाली आहे.

  ट्विटरवर ‘चौकीदार अवधूत वाघ’ या नावाने भाजपाचा राज्यातील प्रवक्ते असलेल्या अवधूत वाघ यांनी शेतकऱ्यांच्या मुलांची एकप्रकारे थट्टा केली आहे. शिवाय, ट्विटरवर अवधूत वाघ सारखेच वादग्रस्त ट्वीट करत असतो. यावेळी मात्र अवधूत वाघ यांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांचीच एकप्रकारे खिल्ली उडवली आहे.

  काय म्हणाले होते अवधूत वाघ

  सर्वसामान्यांचा आवाज असलेल्या पत्रकार आणि शेतकरी पुत्रांना ट्रोल करणाऱ्यांना मराठा क्रांती वॉरियर या ट्विटर अकाऊंटकडून इशारा देण्यात आला होता. त्या ट्वीटला रिप्लाय देताना भाजप प्रवक्ते असलेले अवधूत वाघ यांनी अर्वाच्य भाषा वापरुन, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांचा अपमान केला.'आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याची मुले अनाथ म्हणजे लावारिस असतात बाबा.', असा ट्विट रिप्लाय अवधूत वाघ यानी दिला.

  बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

  This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.