पाटोदा तहसिलदाराचा हेकेखोरपणा ; कामबंद आंदोलनाचा कर्मचाऱ्यांचा इशारा

पाटोदा (शेख महेशर): कारण नसताना पत्रकारावर दबाव टाकण्यासाठी खोटे गुन्हे दाखल करणे, दोन ‘जिल्हाधिकारी यांच्या अधिकाराचा वापर करणे या सह अन्य प्रकरणात वादग्रस्त ठरलेल्या पाटोदा तहसीलदार यांच्या मनमानीला कार्यालयातील कर्मचारी ही वैतागले आहेत. संचिकांवर सही न करणे मागील तारीख टाकणे कर्मचान्याला निलंबनाची धमकी देणे या प्रकाराला कर्मचारी वैतागले असून उपविभागीय अधिकारी याना निवेदन देऊन कामबंद आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. पाटोदा तहसील मधील २० ते २२ कर्मचाऱ्यानी गुरुवार दि २८ रोजी उपविभागीय अधिकारी पाटोदा याना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की कार्यालयीन स्टेशनरी पुरवण्याचे अधिकार तहसीलदार याना असताना अनेक वेळा मागणी करून ही स्टेशनरी पुरवली जात नाही सध्या निवडणूक असल्याने तातडीचा पत्रव्यव्हार करावा लागतो तो कर्मचाऱ्यांना पदरमोड करूनच या साठी अनेक वेळा निवेदन देण्यात आली पण त्याचा विचार करण्यात आला नाही तसेच कार्यालयातील संचिका स्वाक्षरीस सादर केल्या नंतर त्या वर पाठीमागची तारीख टाकण्यात येते. अनेक वेळा तर सही न करताच संचिका परत पाठवली जाते या तील काही संचिका न्यायालयीन व तात्काळ असतात पण यात पुन्हा कर्मचाऱ्यांचा बळी जातो. या वर कारवाई न झाल्यास २६ मार्च २०१९ पासून काम बंद आंदोलनाचा इशारा दिला होता, पण लोकसभा निवडणूक असल्याने आम्ही हे आंदोलन स्थगित केले होते. पण पाटोदा तहसिलदारांच्या वागण्यात काहीच फरक पडत नाही त्या मुळे आम्ही सर्व कर्मचारी निवडणूकीचे काम करणार पण तहसील कार्यालयीन कामकाजावर आज २८ मार्च २०१९ पासुन कामबंद आंदोलन करत आहोत. तहसीलदार यांच्या हेकेखोर पणाला कर्मचारी कंटाळले आहेत शासकीय कामकाज करत असताना तहसीलदार या अरेरावीची भाषा जनते समोर वापरतात आणि तुमचे निलंबन करू कार्यमुक्त करू काही दिवसापूर्वी दोन कोतवालाला निलंबित केले तसेच निवडणूक नायब तहसीलदार यांना एकतर्फी कार्यमुक्त केले आहे आम्ही सर्वजण तणावाखाली कामकाज करत असून आम्हाला जिल्हाधिकारी यांनी न्याय द्यावा अशी मागणी येथील कर्मचारी दिनकर गर्जे, श्रीमती व्ही व्ही पोले, एस ए मिसाळ, प्रदीप बाबर, एस.एस. मुळीक, वायबत, एन.एस. सत्तार, डी डी नागरगोजे, शिकलगार, व्ही. व्ही. देशपांडे, व्ही.एन. जाधव, बी.जी.घोलप, बहिर्वळ वैशाली, एन.एच.शेख, गणेश जाधव,आणि एस.व्ही.ढाकणे यांनी केली आहे.


Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.