घोसला,दि.१०:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― सोयगाव-बनोटी रस्त्यादरम्यान घोसला गावाजवळ अचानक रस्ता खचल्याने राज्यमार्ग-२४ वरून वाहतूक ठप्प झाली होती.घोसला शिवारात झालेल्या तुरळक रिमझिम पावसामुळे सोयगाव-बनोटी रस्ता खचला आहे.
घोसला गावाजवळ अचानक रस्ता खचल्याने खळबळ उडाली होती.सोयगाव-बनोटी रस्त्याचे नुकतेच काम झालेले असून फर्दापूर ते चाळीसगाव साठी हा एकमेव राज्यमार्ग आहे.परंतु हा मार्ग खचल्याने बह्तुकीची कोंडी झाली असल्याने आता सोयगाव तालुक्यातील वाहनधारकांना बनोटी जाण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या आहे.रस्त्याच्या शेजारीच पूल आहे रस्ता खचल्याने पुलालाही धोका निर्माण झाला असून सार्वजनिक विभागाच्या रस्त्यावरील जिल्हा परीशादेच्घ्या बांधकाम विभागाचा पूल कोसळण्याची भीती व्यक्त होत आहे.