पाटोदा:नानासाहेब डिडुळ― नगरपंचायतचा कारभार म्हणजे मला पाहा आणि फुलं वाहा असाच असून शहरात जागोजागी नाल्या तुंबल्याने शहरात मच्छराचे साम्राज्य वाढले असल्यामुळे शहरात साथीच्या रोगाचे रुग्ण वाढू लागले असले तरी पाटोदा नगरपंचायत डोळे झाकून गप्प असून नगर पंचायत हद्दीतील प्रभाग चार मधील डॉक्टर जाधव यांच्या घराच्या पाठीमागील नाली दहा दिवसापासून तुंबली असून याकठे प्रशासनातील कोणाचेही लक्ष नाही यामुळे परिसरात अतिशय दुर्ग॔धी पसरली असुन त्यामुळे नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले असून पाटोदा नगरपंचायतने दोन दिवसात प्रश्न सोडवला नाहीतर पाटोदा नगरपंचायत समोर शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल असा इशारा शिवसेनेचे युवा नेते दत्ता देशमाने यांनी निवेदना द्वारे दिला आहे.