औरंगाबाद जिल्हासावळदबारा सर्कलसोयगाव तालुका

खवल्या मांजराची तस्करी ; तिघांना दोन दिवसांची वन कोठडी

सोयगांव दि १३:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― तालुक्यातील सावळदबारा परिसरात दुर्मिळ अशा खवल्या मांजराची तस्करी करणाऱ्या तिघांना आज सोयगांव न्यायालयात हजर केले असता. वनविभागाने केलेल्या मागणीवरून तिघांना दोन दिवसाची वन कोठडी सुनावली आहे..
त्यामुळे आरोपीच्या मोबाईल मध्ये आढळलेल्या माहितीवरून दुर्मिळ वन्यप्राण्यांची तस्करी करणारी मोठी साखळी उघड होण्याची शक्यता आहे..
सोयगांव तालुक्यात मोठे जंगलक्षेत्र आहे. यातील सावळदबारा जंगलक्षेत्रात दुर्मिळ असे खवले मांजराची तस्करी करणारे नासिर खां लाडखां तडवी (२४)अमीर समशेदखां तडवी (१८)व एक सोळावर्षीय विधिसंघर्ष मुलगा (तिघे रा. देव्हारी ता. सोयगांव )यां तिघांना अजिंठा वनविभागाच्या पथकाने खवल्या मांजरासह सापळा रचून (दि १२)गुरुवारी पहाटे पकडले. त्या तिघांना आज (दि १३ )शुक्रवारी सोयगांव न्यायालयात हजर करण्यात आले होते. घटनास्थळावरून फरार झालेले दोन आरोपी पकडण्यासाठी व अधिक माहिती मिळवून दुर्मिळ वन्यप्राण्याची तस्करी करणारी मोठी साखळी उघड करण्यासाठी वन कोठडी मिळावी अशी विनंती वनपरीक्षेत्र अधिकारी राहुल सपकाळ यांनी न्यायालयास केली त्यावरून दोन दिवसाची कोठडी सुनावण्यात आली आहे.

आरोपीच्या मोबाईलमुळे मोठं रॅकेट उघड होण्याची शक्यता

सावळदबारा येथे दुर्मिळ खवल्या मांजराला पकडणाऱ्या आरोपीच्या मोबाईल मध्ये मांजर, मांडूळ आदी वन्यप्राण्यांचे फोटो व व्हिडीओ आढळले.हे व्हिडीओ कुणाला तरी पाठविण्यात आले आहे त्यामुळे मोठा आर्थिक व्यवहार होणार होता असा संशय आहे आणि घेणारे कोण आहे हे आता कळणार असून मोठं रॅकेट उघड होण्याची शक्यता आहे..

Back to top button