औरंगाबाद जिल्हासोयगाव तालुका

राज्यातील पहिले वातानुकुलीत बस स्थानक गोंदेगावला ,लोकार्पण प्रसंगी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांची माहिती

सोयगाव,ता.१४:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― शिवसेनेच्या माध्यमातून सोयगावचा विकास गतिमान करण्यात आलेला असून राज्यातील पहिले महिलांसाठीचे व १४ वर्षाखालील मुलांसाठी वातानुकुलीत बसस्थानक गोंदेगावला लोकार्पण करण्यात येत असल्याची घोषणा शनिवारी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केली.या वातानुकुलीत बसस्थानकाचे उद्घाटन राज्यमंत्री अब्दुल सत्तार,पाचोराचे आमदार किशोर पाटील,कन्नडचे आमदार उदयसिंग राजपूत यांच्या हस्ते करण्यात आले.सोयगाव तालुक्यातील एकमेव गोंदेगाव ता.सोयगाव येथील वातानुकुलीत बसस्थानक हे राज्यातील पहिले बसस्थानक असल्याचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले.राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी बोलतांना सांगितले कि,जिल्ह्यात रस्त्यांचे कामे जबाबदारीने हाती घेण्यात येतील यासाठी कन्नडचे आमदार उदयसिंग राजपूत,विधानपरिषद आमदार अंबादास दानवे आम्ही एकत्रित बसून जिल्ह्यातील रस्त्यांचा आराखडा तयार करून वर्षभरात जिल्ह्यातील सर्व रस्ते चकाचक करण्यात येतील असे आश्वासन त्यांनी गोंदेगावला दिले आहे.सरपंच वनमाला निकम आणि शरद निकम यांनी सपत्नीक राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचा गावाचं वतीने सत्कार केला.यावेळी व्यासपीठावर आमदार किशोर पाटील,आमदार उदयसिंग राजपूत,उपजिल्हा प्रमुख राजेंद्र राठोड,समाज कल्यान सभापती मोनाली राठोड,जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अर्जुन गाढे,सोयगावच्या सभापती प्रतिभा जाधव,सरपंच वनमाला निकम,तालुका प्रमुख प्रभाकर काळे,शहरप्रमुख संतोष बोडखे,दिलीप मचे,सरपंच वनमाला निकम,शरद निकम,पल्लवी चौधरी,तहसीलदार रमेश जसवंत,आदींची उपस्थिती होती.यावेळी पाचोराचे आमदार किशोर पाटील यांनी मराठवाड्यातील रस्त्यांची चिंता व्यक्त केली,आमदार उदयसिंग राजपूत यांनी विकासाबाबत मनोगत व्यक्त केले.

उपजिल्हा प्रमुख राजेंद्र राठोड यांची वातानुकुलीत बसस्थानकाची संकल्पना-

शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख राजेंद्र राठोड हे शिवसेनेच्या माध्यमातून विकासात चर्चेत राहण्यासाठी वेगवेगळे उपक्रम तालुक्यात राबवीत असून गोंदेगावला वातानुकुलीत बस स्थानकाची संकल्पना त्यांनी राबवून रामदास कदम यांचेशी पाठपुरावा करून डोंगरी विकास निधीतून गोंदेगावला वातानुकुलीत महिलांसाठीचे बसस्थानक मंजूर करून आणले व त्याचे लोकार्पण करण्यात आले.

केंद्र सरकारवर टीकास्त्र—-

केंद्राने राज्याचा हक्काचा निधी अद्यापही दिलेला नसून राज्याच्या विकासासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कधीही मागे हटले नसून कोरोना काळातही राज्याने भरघोस निधी राज्याला दिलेला असून त्यातील खारीचा वाटा म्हणून सिल्लोड-सोयगावचं वाट्यावर आलेअल असल्याचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले.

यावेळी उपसरपंच दीपक अहिरे,ग्राम पंचायत सदस्य पल्लवी चौधरी,छाया सूर्यवंशी,ज्योती नगरे,गौरव बिंद्वाल,हिम्मत कोळी,दीपक खोडके,मंगलाबाई अहिरे,मनीषा ढाकरे,रेखा पवार,अतुल बोरसे,विजय सोनवणे,आदींसह डॉ.प्रमोद महालपुरे,वाल्मिक निकम,युवसेना तालुकाप्रमुख स्वप्नील पाटील,प्रशांत चौधरी,शरद निकम,विजय नगरे,सदशिव महालपुरे,बापू खनतडे,राजेंद्र कोळी, धरमसिंग सोळून्खे,सरपंच अनिल सोळून्खे,भगवान पालकर,नितीन बोरसे,गोरख निकम,बबलू पाटील,सुपडू पाटील,आबा बोरसे,अभयसिंग पाटील,शरद महालपुरे,सतीश पखाले,दिलीप पवार,विनोद नेरपगार,सुधाकर अहिरे,समाधान कोळी,अनिल निकम,निलेश भोकरे,आदींची उपस्थिती होती.

Back to top button