पावसाअभावी सोयगाव तालुक्यात दुबार पेरणीचे संकट
राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केली पीक पाहणी
सोयगाव:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― पावसाअभावी नुकसान झालेल्या पिकांचे तात्काळ पंचनामे करून तालुक्यातील पिकांचा प्राथमिक अहवाल शासनास सादर करा असे निर्देश महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी संबंधित विभागास दिले.
सोयगाव तालुक्यात जवळपास 15 ते 20 दिवसापासून पावसाने उघडीप दिल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांपुढे दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहेत. पावसाअभावी मका पीक करपत असून सोयाबीनची पाने – फुले गळताना दिसत आहेत. तसेच पावसाअभावी तालुक्यातील कापूस, तूर इत्यादी सर्वच पिके धोक्यात आली आहे. सोमवार ( दि.16 ) रोजी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी सोयगाव, फर्दापुर व सावळतबारा सर्कलचा दौरा करून जंगला तांडा, जामठी, घाणेगाव, नंदा आदी ठिकाणी जावून येथील पिकांची पाहणी केली. त्यासोबतच येथील काही शेतकऱ्यांशी संवाद साधून राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी शेतकऱ्यांना धीर देण्याचे काम केले. यावेळी पावसाअभावी नुकसान झालेल्या पिकांचे तात्काळ पंचनामे करून तालुक्यातील पिकांचा प्राथमिक अहवाल शासनास सादर करण्याचे निर्देश राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी महसुल तसेच कृषी विभागास दिले.
यावेळी जि. प. बांधकाम सभापती किशोर बलांडे, शिवसेना तालुकाप्रमुख प्रभाकर ( आबा ) काळे, तहसीलदार रमेश जसवंत, शहर प्रमुख संतोष बोडखे, उस्मान पठाण, तालुका उपप्रमख गुलाबराव कोलते, मा.सभापती धरमसिंग चव्हाण, बाबू चव्हाण, शिवाप्पा चोपडे, दारासिंग चव्हाण, रविंद्र बावस्कर, रशीद पठाण, विलास वराडे, दिलीप देसाई, हिरा चव्हाण, सिताराम जाधव, भागवत जाधव, विलास राठोड, गणेश खैरे, राधेश्याम जाधव, बाळू पाटील, सुरेश चव्हाण, हिरा चव्हाण, आदींची उपस्थिती होती.
————————————–
सिल्लोड – सोयगाव मतदार संघात पावसाने दडी दिल्याने सद्याच्या पीक परिस्थिती बाबत मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांना माहिती दिली. ज्यांनी पीकविमा भरला त्यांना पीक विम्याचा लाभ मिळावा त्यासोबतच ज्यांनी पीक विमा भरला नाही असे जवळपास 60 टक्के शेतकरी असून त्यांना सरकारकडून भरपाई मिळावी अशी मागणी केली आहे. या बाबत मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक भूमिका घेत सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असून शेतकऱ्यांना मदत करण्यात राज्य सरकार कटिबद्ध असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
– राज्यमंत्री अब्दुल सत्तार